मेघालयात BSF च्या चौकीवर ‘बांग्लादेशी’ जमावाचा ‘हल्ला’, जवान जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही संशयित बांग्लादेशी नागरिकांनी मेघालयात सीमेवरील चौकीला लक्ष केले. यावेळी या जमावाने जवानांवर हल्ला देखील केला आणि जवानांच्या हातातील हत्यारे खेचून घेतली. यात दोन जवान जखमी झाले आहेत. तसेच मेघालयामध्ये दुसरा एक बांग्लादेशींचा समूह एका व्यक्तीच्या घरात शिरला आणि घरातील पैसे, मोबाइल फोन आणि बंदुक चोरुन जमावाने पळ काढला अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. यात या घरातील व्यक्ती जखमी झाली.

जवानांवरील हल्ल्याची घटना मध्यरात्री अमदोह आणि रोंगतिला येथे घडली असे पश्चिम जयंतिया हिल्सचे पोलीस अधीक्षक लकादर सियेम यांनी सांगितले. अमदोह आणि रोंगतिला हे भारत बांग्लादेश सीमेपासून 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. सियेम यांनी माहिती दिली की 10 ते 15 बांग्लादेशी नागरिकांच्या एका समुहाने सीमा सुरक्षा दलाच्या दोन जवानांना रोंगितला सीमा चौकीजवळ घेरले. त्यानंतर या जमावाने जवानांच्या हातातील हत्यारे देखील खेचून घेतली.

सियेम यांनी माहिती दिली की पळवण्यात आलेली हत्यारे जवळच्या जंगलात सापडली. या घटनेपूर्वी आणखी एक बांग्लादेशी समूह अमदोह गावातील प्रताप बारेह या व्यक्तीच्या घरात शिरला. हे गाव रोंगतिला बीओपीच्या जवळ आहे. त्यांनी घरातील पैशांसह वस्तू लूटल्या. बारेह आणि बीएसएफ जवानांना उपचारासाठी दौकी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मेघालयचे शिक्षण मंत्री लंखमेन रेम्बुई यांनी या घटनेचा निषेध केला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/