जॅकलिनच्या ‘त्या’ फोटोवर अभिनेत्री शिल्पा शेट्टीची प्रतिक्रिया, म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमी चाहत्यांसोबत अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसून येते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. नुकताच जॅकलिनने सोशल मीडियावर काही हॉट फोटो शेअर केले असून फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव केला आहे. तर अभिनेत्री शिल्पा शेट्टीने त्यावर ‘जॅकलिन खूप मस्त’ असे म्हणत तीचे कौतुक करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच अभिनेत्री यामी गौतमीने देखील कमेंट करत जॅकलिनचे कौतुक केले आहे.

जॅकलिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे हॉट फोटो शेअर केले आहेत. बॅलेरिना स्टाइलमध्ये हे फोटो शूट केले असून ती पायाच्या बोटांवर शरीराचा तोल सांभाळताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर तीचे हे हॉट फोटोने धूमाकूळ घातला आहे. जॅकलिनच्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. जॅकलिन लवकरच ‘किक 2’, बच्चन पांडे’ आणि भूत पोलीस या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. लॉकडाउनच्या काळात ती अभिनेता सलमान खानसोबत त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर वेळ घालवत होती. त्यावेळी तिचे आणि सलमानचे गाणे प्रदर्शित झाले होते.