शिल्पा शेट्टी बनली वर्णद्वेषाची शिकार

मेलबर्न : वृत्तसंस्था

वर्णभेदाचा शाप अजुन संपलेला नाही याचाच नुकताच अनुभव घेतलाय अभिनेत्री शिल्पा शेट्टी -कुंद्राने… शिल्पा सिडनीहून मेलबर्नला जात होती, या प्रवासादरम्यान तिला हा अनुभव आला आहे. याबद्दल तिने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित याबाबत शिल्पाने आपला राग व्यक्त केला तसेच प्रवाशाच्या रंगावरून त्यांच्यासोबत अपमानास्पद वर्तन केलं जाऊ शकत नाही, असंही शिल्पाने म्हटलं आहे. तसेच ऑस्ट्रेलियाच्या क्वांटास एअरलाईन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यावर तिने वर्णद्वेषाचा आरोप ही केला आहे. शिल्पानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की,” मेलबर्नला जाताना सिडनी विमानतळावर चेक इन काऊंटरवर तुनक मिजाज मेल नावाची महिला कर्मचारी भेटली. तुमच्यासारख्या सावळ्या लोकांसोबत असंच बोलायला हवं, अश्या रोखात ती माझ्याशी बोलत होती. नंतर, राग काढण्यासाठी माझी बॅग ओव्हर साईज असल्याचं सांगत तिने सांगितले. मुद्दाम त्रास देण्यासाठी तिने मला दुसऱ्या काऊंटरवर पाठवलं. मात्र दुसऱ्या काऊंटरवरील कर्मचाऱ्याने माझी बॅग ओव्हरसाईज नसल्याचं स्पष्ट केले. तसेच, मला जाण्याची परवानगी दिली.”

“त्यानंतरही त्या महिलेची अरेरावी चालुच होती. ती महिला कर्माचारी पुन्हा आली आणि काऊंटरवरील दुसऱ्या कर्मचाऱ्याला माझी बॅग तपासण्यास सांगितली. पुन्हा काऊंटरवरील कर्मचाऱ्यांने माझ्या बॅगेची तपासणी करण्यास सांगितली.पुन्हा बॅगेची तपासणी करुन मला सामान घेऊन जाण्याची परवानगी दिली”, अशी माहिती शिल्पाने आपल्या पोस्टमधून दिली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2bf39674-c00a-11e8-a369-a9f678396656′]

शिल्पाने ही पोस्ट लिहिण्याचे कारणची सर्वांनी सांगितले. “ही पोस्ट मी क्वांटास एअरलाईन्ससाठी लिहिली आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना प्रवाशांसोबत कसे वागावे आणि व्यक्तीचा रंग पाहूण त्यांना अपमानास्पद वागणूक न देण्याची समज देतील”, अशी आशा शिल्पाने व्यक्त केली आहे. तसेच फोटोत पाहा, काय माझी बॅग ओव्हर साईज आहे? असंही शिल्पाने पोस्टमधून विचारलं आहे. यापूर्वीही शिल्पा अश्याच प्रकारच्या वर्णभेदाची शिकार बनली होती. २००७ मध्ये शिल्पा ‘बिग ब्रदर’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. यावेळी काही स्पर्धकांकडून तिला तिच्या रंगावरून अपमानस्पद वागणूक मिळाली होती. या रिअॅरिटी शोची शिल्पा विजेती ठरली होती.

‘ह्या’ अभिनेत्याच्या पत्नीला झाला कॅन्सर