Shilpa Shetty Fitness Video | शिल्पा शेट्टीनं व्हिडिओ शेअर करून महिलांना मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी दिल्या खास टिप्स, कॅप्शनमध्ये लिहिला मौल्यवान संदेश
पोलीसनामा ऑनलाईन टीम – Shilpa Shetty Fitness Video | मोठ्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आपल्या फिटनेस बद्दल प्रचंड जागरूक असते. ती सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. शिल्पा नेहमीच तिचा योगाचे व्हिडिओ शेअर करून, चाहत्यांना फिटनेसबद्दल (Shilpa Shetty Fitness Video) माहिती देत असते. फिटनेस फ्रेक (Fitness Freak) शिल्पा अभिनयात देखील काही कमी नाही. तिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिक प्रेक्षकांच्या मनात एक घर केलं आहे. मात्र शिल्पाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय.
शिल्पा शेट्टीनं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये (Shilpa Shetty Fitness Video) शिल्पानं महिलांना मासिक पाळीचा (Period Pain) त्रास कमी करण्यासाठी काही खास टिप्स (Period Pain Tips) दिल्या आहेत. व्हिडिओमध्ये मासिक पाळीच्या वेळी करू शकतील असे काही योगासन सांगितले आहे. ज्यामुळं मासिक पाळीचा (Menstruation Pain) त्रास कमी होण्यास मदत होईल.
शिल्पा शेट्टीनं सेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडिओखाली कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं आहे कि, “मासिक पाळीच्या (Menstruation) या दुखण्याला प्रत्येक महिन्याला सहन करनं काही सोप्पी गोष्ट नाहीये. महत्वाची बाब म्हणजे जेव्हा आपल्याकडे अनेक जबाबदाऱ्या असतात, परंतु नेहमी स्वत:ला वेळ देऊन आणि नियमित योगा करून आपल्याला या त्रासापासून आराम मिळू शकतो. त्यामुळं मासिक पाळीची सायकल (Menstruation Cycle) सुद्धा नॉर्मल राहते.”
दरम्यान, शिल्पाच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी चांगली पसंती दर्शवली आहे. व्हिडिओमध्ये शिल्पा जमिनीवर योगा मॅटवर योगासन करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिनं कॅज्युअल आऊटफिट घातलेले दिसत आहे. तर महिलांना तिच्या या व्हिडिओमधून एक मोलाचा असा संदेश मिळाला आहे
Web Title :- Shilpa Shetty Fitness Video | shilpa shetty tell women tips to get rid of period pain
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update