Pune Crime | पुण्यात भेसळयुक्त ताडीची विक्री करणारा गुन्हेगार 1 वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 57 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील (Pune Crime) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या (chaturshringi police station) हद्दीत रासायनिक भेसळयुक्त ताडीची (Chemically Adulterated Toddy) बेकायदेशीर विक्री (Illegal Sale) करणाऱ्या अभिलेखावरील गुन्हेगार अनिल व्यंकटेश भंडारी Anil Venkatesh Bhandari (वय-25 रा. गिरीराज चौक, सुतारवाडी, पाषाण-Pashan) याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार (MPDA Act) एक वर्षासाठी स्थानबद्धतेची (Pune Crime) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल 57 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

 

अनिल भंडारी याला एमपीडीए कायद्यान्वये औरंगाबाद कारागृहात (Aurangabad Jail) एक वर्षाकरीता स्थानबद्ध करण्यात आले आहे. आरोपी हा अभिलेखावरील गुन्हेगार (Criminals on Record) असून त्याने त्याच्या साथीदारांसह चतु:श्रृंगी पोलीस ठाणे, पुणे हद्दीमध्ये (Pune City) बेकायदेशीरपणे भेसळयुक्त ताडी विक्री केल्याप्रकरणी चार गुन्हे (FIR) दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी (Pune Crime) कृत्यांमुळे परिसरातील लोकांच्या आरोग्यास, जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण झाला आहे. तसेच सार्वजनिक सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. आरोपीची या भागात दहशत असल्याने त्याच्या विरोधात तक्रार करण्यास कोणी धजावत नव्हते.

प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अनिल भंडारी याच्यावर एमपीडीए अ‍ॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले. चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे (Senior Police Inspector Rajkumar Waghchaure), पी. सी. बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Senior Police Inspector Vaishali Chandgude) यांनी ही कामगिरी केली.

 

पोलीस आयुक्तांनी मागील एक वर्षात 57 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
यापुढेही सराईत व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर (Active Criminal) अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) कंबर कसली आहे.
त्यानुसार गुन्हेगारांवर मोक्का (MCOCA Action) Mokka, तडीपार आणि स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे.

 

Web Title :- Pune Crime | CP Amitabh Gupta s Action On Criminals MPDA on Anil Venkatesh Bhandari chaturshringi police station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा