Shinde-Fadnavis Government | शिंदे-फडणवीस सरकार सुस्साट ! 24 दिवसांतच काढले तब्बल 538 GR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shinde-Fadnavis Government | राज्यात शिंदे – फडणवीस यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला (Cabinet Expansion) अद्याप मुहूर्त सापडला नसला तरी प्रशासकीय पातळीवर राज्याचा कारभार दोन मंत्र्यांवरच सुरु आहे. दोन मंत्र्यांकडून राज्याचा कारभार जोरात सुरु आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) – देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारच्या (Shinde – Fadnavis Government) शपथविधीच्या पहिल्या 24 दिवसांतच तब्बल 538 जीआर (GR) काढण्यात आलेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्रिमंडळ अस्तित्वात नसल्याने ते प्रशासकीय पातळीवरच काढले गेले. हा वेग पाहता दिवसाकाठी 2 तर कार्यालयीन वेळ गृहीत धरली तर प्रत्येक तासाला 2.5 जीआर काढण्यात आले आहेत.

 

दरम्यान, शिंदे – फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) आघाडी सरकारच्या काही मंजूर कामांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला होता. महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) अल्पमतात आले. त्यामुळे बेकायदेशीर जीआर काढण्यात आल्याचे सांगत शिंदे – फडणवीस सरकारने ते रद्द केलेत. अखेरच्या काही दिवसांत आघाडी सरकारने सर्वाधिक जीआर काढल्याचा आरोप करण्यात आला.

 

शिंदे – फडणवीस सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सरकारपेक्षा 50 टक्के जास्त वेगाने हे जीआर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहेत. सर्वाधिक जीआर हे सार्वजनिक आरोग्य विभाग (Public Health Department), पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग (Water Supply and Sanitation Department), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग (School Education and Sports Department), सामान्य प्रशासन विभाग (General Administration Department), जलसंपदा विभाग (Water Resources Department), महसूल आणि वन विभाग (Revenue and Forest Department) आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे (Medical Education Department) आहेत. संसदीय कार्य आणि माहिती तंत्रज्ञान विभागाची माहिती मिळू शकली नाही.

 

शिंदे – फडणवीस सरकारने काढलेले जीआर

सार्वजनिक आरोग्य – 73
पाणीपुरवठा व स्वच्छता – 68
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग – 43
सामान्य प्रशासन विभाग – 34
जलसंपदा विभाग, महसूल व वन विभाग आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य (3) प्रत्येकी – 24

 

ग्रामविकास विभाग : 22

कृषी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय – 22
उच्च व तंत्रशिक्षण – 21
गृह विभाग : 20
आदिवासी विभाग : 19
मृद व जलसंधारण : 17

 

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य : 14

सहकार, पणन व वस्त्रोद्योग : 13
सार्वजनिक बांधकाम : 13
कौशल्य विकास व उद्योजकता : 12
महिला व बालकल्याण विभाग : 10

 

सर्वात कमी जीआर

मराठी भाषा विभाग 1
पर्यावरण विभाग 2
अन्न व नागरी पुरवठा, इमाव कल्याण, गृहनिर्माण आणि पर्यटन व सांस्कृतिक (4) प्रत्येकी 5
उद्योग, ऊर्जा आणि कामगार, नगरविकास विभाग, नियोजन विभाग व वित्त विभाग (4) – प्रत्येकी 9

 

Web Title :- Shinde-Fadnavis Government | eknath shinde devendra fadnavis government in full swing 538 grs were drawn in the first 24 days

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा