Shinde-Fadnavis Government | शिंदे-फडणवीस सरकारने आता आपले खरे रंग दाखवायला रुवात केली, राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) आता आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) राज्याचे प्रमुख प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात ग्रामिण भागांसाठी सुचविलेल्या कामांना नव्या शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis Government) सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे महेश तपासे आक्रमक झाले आहेत.

 

महाविकास आघाडी सरकारच्या काळात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी ग्रामीण भागांत काही योजना मंजूर केल्या होत्या. तसेच त्यांनी काही निधी देखील दिला होता. तो नवीन सरकारने रद्द केल्याचा शासन निर्णय 12 ऑक्टोबरला प्रसिद्ध झाला आहे. त्यावर महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या शासन निर्णयामुळे शिंदे यांच्या सरकारमधील मंत्र्यांना देखील फटका बसला आहे. शिंदे यांच्या मंत्र्यांमध्ये देखील या निर्णयामुळे नाराजी आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात ग्रामविकास खात्यांतर्गत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील सर्व
ग्रामिण भागांत मोठ्या प्रमाणावर विकासकामे आणि त्यांच्याकरीता निधीचे वाटप केले गेले होते.
मात्र शिंदे यांचे सरकार (Shinde-Fadnavis Government) सत्तेवर येताच या खात्याचे उपसचिव कालू गोन्या वळवी (Kalu Gonya Valvi)
यांनी राज्यपालांच्या (Governor Bhagat Singh Koshyari) आदेशानुसार 1 एप्रिल 2021 पासूनची सर्व मंजूर कामे रद्द करण्याचा शासन निर्णय जाहीर केला.
त्यामुळे शिंदे सरकार आपल्या वैयक्तीक रागापोटी आणि राजकारणासाठी महाविकास आघाडीच्या निर्णयांना रद्द करत आहे,
असे महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे मत आहे.

 

Web Title :- Shinde-Fadnavis Government | ncp spoke person mahesh tapase targets eknath shinde fadnavis government after hasan mushrif s decision cancel

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sandipan Bhumre | नाराज संजय शिरसाटांना मंत्रिपद मिळणार की लटकवणार, मंत्री भुमरे स्पष्टच बोलले…

Andheri by-Election | ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला तर? ठाकरेंचा प्लॅन बी

Subhash Desai | घोडा मैदान आता लांब नाही, शेलारांच्या टीकेला सुभाष देसाईंचे प्रत्युत्तर