Shinde Fadnavis Govt | अनेक पदे रिक्तच ! तरीही 500 अधिकार्‍यांना घरबसल्या फुकट पगार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Govt) सत्तेवर येऊन साधारणपणे 5 महिने झाले आहेत. त्यांनी सत्तेवर आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रशासनात विविध पदांवर काम करणाऱ्या जवळपास 500 अधिकाऱ्यांची त्यांच्या पदावरून हकालपट्टी केली. या अधिकाऱ्यांना कुठेही दुसरीकडे नियुक्ती देणे अपेक्षित होते. पण तसे झाले नसल्यामुळे हे अधिकारी गेले पाच महिने फुकट पगार घेत असल्याचे समोर आले आहे. (Shinde Fadnavis Govt)

साधारणपणे, १ जुलैपासून हे अधिकारी घरी बसून आहेत. यात फक्त मंत्रालयातीलच जवळपास दीडशेच्या आसपास अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे हे अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. हे अधिकारी घरी बसले असले तरी, त्यांचा पगार मात्र सुरू आहे. नियुक्तीच नसल्याने हे अधिकारी कार्यालयात जात नाहीत, त्यात त्यांना हजेरी लावणेही बंधनकारक नाही. त्यामुळे घरी बसले तरी त्यांचे वेतन मात्र नियमितपणे दर महिन्याला निघते.

सरकार बदलले की अधिकाऱ्यांच्या बदल्या करून मर्जीतील अधिकारी महत्त्वाच्या पदांवर आणणे ही राजकारणातील
सर्वमान्य गोष्ट आहे. शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde Fadnavis Govt) अधिकारी बदलताना तीन
वर्षांचा कार्यकाळ पूर्ण न केलेल्या अधिकाऱ्यांनाही पदावरून काढले.
त्यातही, राज्य सरकारमधील अनेक पदे रिक्त असूनही, या अधिकाऱ्यांना दीर्घ काळ नियुक्ती दिलेली नाही. सध्या काही अधिकारी मंत्री कार्यालयात ओएसडी म्हणून काम करत आहेत. मात्र, यातील काही अधिकाऱ्यांना अद्याप अधिकृत नियुक्ती दिली नसल्याचे समोर आले. केवळ तोंडी आदेशाने हे अधिकारी मंत्री आस्थापनावर काम करत आहेत.

Web Title :- Shinde Fadnavis Govt | five hundred officers were given home pay many became osds on verbal orders

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kolhapur Crime | चुलतीवर बलात्कारप्रकरणी पुतण्याला 10 वर्षांची सक्तमजुरी, कोल्हापूरमधील घटना

Sanjay Raut | गद्दारांना आई-बहिणीवरून शिव्या येतात; ‘मग त्या राज्यपाल आणि मंत्र्यांना द्या’ – संजय राऊत