Shinde-Fadnavis Govt | पुणे महापालिकेच्या विकासकामांच्या उदघाटन, भूमीपूजनावरून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडवणीस यांच्यात बेबनाव?; CM शिंदेंनी ऐनवेळी पुणे दौरा रद्द केल्याने राजकिय वर्तुळात चर्चा सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shinde-Fadnavis Govt | पुण्यातील विकास कामांवरून (Pune Development Work) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामध्ये बेबनाव झाल्याच्या चर्चेला दुजोरा मिळत आहे. महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) वतीने येरवड्यातील गोल्फ क्लब चौकात उभारण्यात आलेल्या उड्डाणपूलाच्या (Pune: Flyover At Yerwada Golf Course) उद्घाटन व अन्य भूमिपूजन कार्यक्रमांकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठ फिरविली. (Shinde-Fadnavis Govt)

 

पुणे महापालिकेच्या वतीने येरवडा येथील गोल्फ क्लब चौकात उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. येत्या सोमवारी आणि मंगळवारी पुण्यात जी २० परिषदेत होत आहे. या पार्श्वभूमीवर उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात येत आहे. तसेच अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालय इमारतीचे भूमिपूजन देखील करण्यात येत आहे. (Shinde-Fadnavis Govt)

पुणे महापालिकेत भाजपची सत्ता होती. त्यामुळे ही उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते व्हावीत यासाठी भाजप प्रयत्नशील होते. तर नगरविकास मंत्रालय हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने त्यांच्या हस्ते उद्घाटन व्हावे अशी शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांची इच्छा होती. यामुळेच वर्क ऑर्डर दिल्यानंतरही काही आठवड्यांपासून भूमिपूजनाअभावी प्रकल्पांची कामे सुरू झाली नव्हती. अखेर आज या कार्यक्रमांना मुहूर्त लागला. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते भूमिपूजन आणि उड्डाणपूलाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. तशा जाहिरातीही भाजपने प्रसिद्ध केल्या आहेत.

 

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुपारी चार वाजता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमास उपस्थित राहाणार असल्याचे पत्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आले. दौर्‍यामध्ये भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहाणार असल्याचा उल्लेख नव्हता. मात्र, दुपारी अवघ्या तासाभराने अर्थात ४ वाजता कोथरूड येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभास उपस्थित राहाणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, या स्पर्धेकडे देखिल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठ फिरवत दौराच रद्द केल्याने या दोन्ही पक्षांमधील बेबनावाला पुष्टी मिळाली आहे.

 

शिंदे गटाला पुण्यात मर्यादीत ठेवण्याचा भाजपचा डाव

ठाणे, मुंबई शहरामध्ये शिंदे गटाची बर्‍यापैकी ताकद आहे. तर मागील निवडणुकीमध्ये भाजपने पुणे महापालिकेत मोठी ताकद निर्माण केली आहे. ठाणे आणि मुंबईमध्ये सत्ता आणण्यासाठी भाजप शिंदे गटाचा व्यवस्थित वापर करत आहे. मात्र, पुण्यामध्ये शिंदे गटाची ताकद वाढू द्यायची नाही, असा डाव भाजप रचत आहे. शहरात आज झालेल्या उद्घाटन आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून त्याची प्रचिती आली. भाजपच्यावतीने या कार्यक्रमाच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या जाहिरातींमध्ये भाजपच्या सर्व शिर्षस्थ नेत्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो छापण्यात आला आहे.
परंतू जे शिंदे आमचीच खरी बाळासाहेबांची शिवसेना असा दावा सांगत आहेत,
त्या शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा वापर टाळत आपली दिशा स्पष्ट केल्याची चर्चा पुण्याच्या राजकिय वर्तुळात सुरू झाली आहे.

 

Web Title :- Shinde-Fadnavis Govt | Inauguration of development works of
Pune Municipal Corporation, Bhumi Pujan between Chief Minister Shinde and
Deputy Chief Minister Fadwanis? Discussions started in the political circles after
CM Shinde canceled his visit to Pune on time

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा