Shinde Government | शिंदे सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीचा शासन आदेश जारी, थेट खात्यात रक्कम जमा होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सरकारने (Shinde Government) शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर (Package for Farmers) केली होती. राज्यात अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा देखील विधिमंडळ अधिवेशनात (Legislative Session) मांडला होता. आता राज्य सरकारने (Shinde Government) शेतकऱ्यांच्या मदतीचा शासन निर्णय (Govt Decision) जारी केला आहे. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी 3 हजार 501 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

 

राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे एकूण 23 लाख 81 हजार 920 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. यामध्ये राज्यातील 25 लाख 93 हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी 3 हजार 501 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा वाढीव दराने मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे.

 

 

आपदग्रस्त शेतकऱ्यांना मंजूर मदत तातडीने वितरीत करण्याचा आदेश मदत व पुनर्वसन विभागाकडून (Relief and Rehabilitation Department) काढण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधितांच्या मदतीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानुसार जिरायत शेतीसाठी पूर्वीचा दर प्रति हेक्टरी 6800 वरुन वाढवून प्रति हेक्टरी 13 हजार 600 रुपये, बागायती शेतीसाठी प्रति हेक्टरी 13 हजार 500 वरुन 27 हजार रुपये आणि बहुवार्षिक शेतीसाठी पूर्वीचा दर 18 हजारांवरुन 36 हजार करण्यात आला आहे. जिरायत, बागायत व बहुवार्षिक पिकांच्या बाबतीत यापूर्वी दोन हेक्टरच्या मर्यादेत वाढ करुन प्रती तीन हेक्टर अशी वाढ करण्यात आली असल्याची माहिती राज्य सरकारने (Shinde Government) दिली आहे.

शेतकऱ्यांसाठीचा मदतीचा निधी संबंधित विभागीय आयुक्त (Divisional Commissioner),
जिल्हाधिकाऱ्यांकडे (District Collector) वर्ग करण्यात आला आहे.
ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ऑनलाइन पद्धतीने जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
यासंदर्भात शासन निर्णय महसूल व वन विभागाने शुक्रवारी (दि.8) प्रसिद्ध केला आहे.

 

Web Title :- Shinde Government | CM ekanth shinde government announce package for farmers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune-Solapur Road Accident | दुर्दैवी ! पुणे-सोलापूर रस्त्यावर ट्रकची दुचाकीस्वार मयलेकींना धडक, महिलेचा मृत्यू तर मुलगी गंभीर जखमी

 

MP Navneet Rana | गृहमंत्री फडणवीस खा. नवनीत राणांवर कारवाईचे आदेश देणार का? NCP चा सवाल

 

Use Basil For Natural Face Mask | इम्युनिटीच नव्हे, त्वचेसाठी सुद्धा जबरदस्त आहे तुळस, जाणून घ्या तुळशीचे 5 DIY हॅक्स