Shirur Lok Sabha | शिरूरच्या उमेदवारीवरून आढळराव पाटलांचे एक पाऊल मागे, म्हणाले आग्रही नाही, पक्षप्रमुख…

पुणे : Shirur Lok Sabha | शिवसेनेचे (Shivsena) माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांची म्हाडा पुणे महामंडळ अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आता त्यांना उमेदवारी मिळणार नाही, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. दरम्यान, ही जागा राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादीकडून ऑफर आल्यास स्वीकारणार काय? असा प्रश्न विचारला असता, पक्षप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच (Eknath Shinde) यासंदर्भात निर्णय घेतील. तो मला मान्य असेल, असे म्हणत आढळराव पाटील यांनी वेळ मारून नेली. म्हाडाच्या सोडतीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.(Shirur Lok Sabha)

आढळराव पाटील म्हणाले, शिरूर लोकसभा निवडणुकीत मला तिकीट द्यावे, अशी मागणी मी अजूनही केलेली नाही; तसेच जाहीरही केलेले नाही. पक्षप्रमुख ठरवतील तो निर्णय मान्य असेल.

महायुतीच्या जागावाटपात शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे.
याच मतदार संघात मागच्यावेळी शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील पराभूत झाले होते.
काही दिवसांपूर्वी ते पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची
नियुक्ती म्हाडाच्या पुणे मंडळ अध्यक्षपदी केली.

यानंतर त्यांचा उमेदवारीचा पत्ता कट झाल्याचे बोलले जात आहे. त्यातच ही जागा अजित पवार गटाकडे जाण्याची
शक्यता असल्याने आढळराव पाटील यांनी उमेदवारीवरून माघार घेतल्याचे दिसून येत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Inspector Appointment | पुणे पोलिस आयुक्तालयात नव्याने हजर झालेल्या 7 पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

Sanjay Shirsat Slams Devendra Fadnavis | महायुतीत जुंपली! फडणवीसांना शिंदे गटाचे चोख प्रत्युत्तर, ”…तर भाजपाच्या १०५ जणांना विरोधात बसावं लागलं असतं”

Uddhav Thackeray-Rahul Narvekar | ”भाजपाने लबाड राहुल नार्वेकरला लोकसभेच्या तिकिटाचं लालुच दाखवलं, म्हणूनच…”, उद्धव ठाकरे यांचा गंभीर आरोप

Devendra Fadnavis On Supriya Sule | देवेंद्र फडणवीसांचे सुप्रिया सुळेंना जशास तसे उत्तर उत्तर, मावळ गोळीबाराचा उल्लेख करत म्हणाले…

Retired IPS Makrand Ranade | निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक मकरंद रानडे यांची राज्य माहिती आयुक्त पदी नियुक्ती (Video)