वाघ सदृश्य कातडे विक्रीसाठी आलेल्या नऊ जण शिरूर पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शिरुर मधील पाबळ फाटा येथे वाघ सदृश्य कातडे विक्रीसाठी आलेल्या नऊ जणांना दोन कारसह शिरुर पोलीसांनी ताब्यात घेतले आल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली.

याबाबत शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे यांनी फिर्याद दिली असून मयूर मारुती कोळेकर (वय 22 रा. किवळे तालुका खेड जिल्हा पुणे), वैभव अर्जुन गाडे (वय 20), साईराज विजय गाडे (वय 20 रा खरपुडी राजगुरुनगर ता. खेड, पुणे), चिराग कैलास हांडे वय 26, कौस्तुभ महादेव नायकवडे वय 28,विनायक सोपान केदारी (वय 30 वर्ष, तिघे रा. मंचर ता. आंबेगाव जिल्हा पुणे), शिवाजी किसन कुसळकर (वय 30, रा. कडा, ता. आष्टी, जि.बीड), अमोल बाळू राजगुरू (वय 34, रा. वडगाव काशिंबे, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे), धनंजय रम पाटोळे (वय 22 , रा. वडगाव पाटोळे तालुका खेड जिल्हा पुणे) यांना या प्रकरणी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती नुसार शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांना गुप्त माहिती मिळाली की शिरूर गावची हद्दीत पाबळ फाटा येथे वाहन क्रमांक इको कार एम एच १४ जे एच ५७२७ व हुंदाई कंपनीची एक्सेंट कार पांढऱ्या रंगाची क्रमांक एम एच १४ जी यु ५२१६ या वाहनातून वाघाचे कातडेची विक्री रुपयांना होणार आहे. याबाबत खाञी होताच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख ,बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते ,दौंड विभागाचे उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, सहायक पोलिस निरीक्षक किरण उंदरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पोलिस हवालदार संजू जाधव,पो.ना.संतोष साठे,पो.ना.अनिल आगलावे, पो.काँ.प्रविण पिठले, प्रशांत खुटेमाटे, संतोष साळुंखे, करणसिंग जारवाल, विशाल पालवे, सुरेश नागलोत, तुकाराम गोरे या पथकाने खाजगी वाहनाने व साध्या वेशात शिरुर येथील पाबळ फाटा येथे सहा फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजता सापळा रचून करड्या रंगाची इको कार एम एच १४ जे एच ५७२७ व हुंदाई कंपनीची एक्सेंट कार पांढऱ्या रंगाची क्रमांक आली असता पोलीस पथकाने अलगद या दोन्ही कार व त्यातील लोकांना ताब्यात घेतली.

या कारची झडती घेतली असता कार क्रमांक एम एच १४ जी यु ५२१६ कारच्या डिकी मधे ४ फूट लांबीचे,३.५ रुंदीचे वाघाचे कातडे , त्याच्या वरच्या जबड्यात तेरा दात तर खालच्या जबड्यात अकरा दात, दोन कार असा माल पोलिसांना मिळून आला आहे.

वरील नऊ आरोपी यांच्याकडे चौकशी केली असता सदर वाघाचे कातडे हे तस्करी करून विक्री करण्यासाठी आणले आसल्याने त्यांनी सांगितले.

याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे वनजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 39 ,40 कलम 51 चे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून.पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सदर आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक खानापुरे यांनी दिली.