शिवसेना नेते दिनेश वानखडे यांचे निधन

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख दिनेशनाना वैकुंठराव वानखडे (वय-56 रा. तिवसा) यांचे आज (रविवार) सायंकाळी सहाच्या सुमारास निधन झाले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले आहे.

दिनेश वानखडे यांनी म्हाडाच्या अध्यक्षपदासह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पद भूषवले आहे. पाच-सहा दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

दिनेश वानखडे यांच्या पार्थिवावर सोमवारी (दि.8) तिवसा येथे हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, व बराच मोठा आप्तपरिवार आहे. वानखडे यांच्या निधनामुळे शिवसेनेचे मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.