काठ्या, चष्मे वाटणे, त्याला विकास म्हणत नाही ; शिवतारेंचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकांच्या वातावरणात वाढ होताना दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांना सुरूवात झाली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंनी कुठेही विकास केला नाही, अशी टीका शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात बारामती-मावळमध्ये संतापाची लाट आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांच्या विरोधात बारामती-मावळमध्ये संतापाची मोठी लाट आहे. बारामतीच्या विद्यमान खासादर सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघात कुठेही विकास केला नाही. त्यांनी फक्त काठ्या, चष्मे, श्रवणयंत्र वाटले. याला विकास म्हणत नाहीत, असा घणाघात त्यांनी यावेळी केला. तसंच ही काम मंडळाचे कार्यकर्तेही करतात, अशी टीकाही विजय शिवतारेंनी सुप्रिया सुळेंवर केली.

तसंच, योद्धा नेहमी तलवार काढून असतो. तो फक्त आदेशाची वाट पाहत असतो, असं वक्तव्य त्यांनी यावेळी केली. त्यांच्या या वक्तव्याने विजय शिवतारे हे सुप्रिया सुळेंविरोधात लढण्यासाठी तयार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ह्याहि बातम्या वाचा –

रोहित शेट्टीचा संघर्षमय प्रवास

डॉ. सुजय विखे जाणार खा. गांधी, माजी आ. राठोड यांच्या भोटीला

बाळासाहेब थोरात काही हायकमांड नाहीत : विखे-पाटील

नाना पटोलेंना माझा आशिर्वाद : नितीन गडकरी

बाळासाहेब थोरातांना स्पष्टीकरण द्यायला मी बांधिल नाही , ते काही हायकमांड नाहीत