Shiv Sena MLA Aaditya Thackeray | महाराष्ट्राला आदित्य ठाकरेंचं खुलं पत्र, केंद्र आणि राज्याच्या कारभारावर ओढले आसूड, ”गद्दारांच्या टोळीने शांतीप्रिय…”

मुंबई : Shiv Sena MLA Aaditya Thackeray | भारताच्या लोकशाही मूल्यांचं आणि संविधानाचं कायेदशीर बाबींचा वापर करुन खच्चीकरण केलं जात आहे. जगभरात जिथे लोकशाही संपवण्यात आली, तिथे अशाच संस्थांचा वापर केला गेला. तसेच, २०२२ च्या मध्यात गद्दारांच्या टोळीने (Shinde Governement) शांतीप्रिय आणि प्रगतीशील महाराष्ट्राचं रुपांतर बिल्डर्स आणि कंत्राटदार मिळून चालवत असलेल्या एका बेकायदेशीर राजवटीत केलं, असा घणाघात शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Shiv Sena MLA Aaditya Thackeray) यांनी महाराष्ट्रातील (Maharashtra Political) जनतेसाठी लिहिलेल्या एका जळजळीत पत्रात केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी जनतेसाठी लिहिलेले हे पत्र सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. या पत्रात केंद्र आणि राज्यातील सरकारवर जोरदार प्रहार करण्यात आला आहे, हे पत्र पुढील प्रमाणे –

माझ्या प्रिय महाराष्ट्रवासीयांनो,
हे आपलं वर्ष आहे! आपण हे वर्ष फक्त आपल्यासाठी नाही, तर आपल्या देशासाठी समर्पित करायला हवं. भारताच्या लोकशाही मूल्यांचं आणि संविधानाचं कायेदशीर बाबींचाच वापर करुन खच्चीकरण केलं जाताना दिसत आहे. जगभरात जिथे लोकशाही संपवण्यात आली, तिथे ती संपवण्यासाठी अशाच संस्थांचा वापर केला गेला होता. ज्या खरंतर लोकशाहीच्या रक्षणासाठी अस्तित्त्वात आल्या होत्या. लोकशाही संपवून हुकूमशाही निर्माण झालेल्या ठिकाणी आजपर्यंत सामान्य लोकांच्या भल्यासाठी काहीही झालेले नाही. जे काही केले गेले ते केवळ मोजक्या लोकांसाठी, तुमच्या-माझ्यासारख्या १.३ अब्ज लोकांसाठी तर नक्कीच नाही.

आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर, पुन्हा लोकशाही अस्तित्वात आणणं हेच आपलं ध्येय आहे.
२०२२ च्या मध्यात गद्दारांच्या टोळीने शांतीप्रिय आणि प्रगतीशील महाराष्ट्राचं रुपांतर बिल्डर्स आणि कंत्राटदार
मिळून चालवत असलेल्या एका बेकायदेशीर राजवटीत केलं. आता खोके सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे आपली शहरं उद्ध्वस्त होत आहेत. रस्ते, विकास योजनांमध्ये घोटाळे होते आहेत. उद्यानं गिळंकृत केली जात आहेत. इतकंच नाही तर रस्त्यावरील फर्निचर, सॅनिटरी पॅड्स यांच्याबाबतीतही घोटाळे होत आहेत. हे फक्त भ्रष्ट कारभाराचं वरवरचं टोक आहे. (Shiv Sena MLA Aaditya Thackeray)

ग्रामीण भागातल्या अडचणी तर टोकाच्या भीषण होत आहेत. शेतकरी आत्महत्या वाढतच चालल्या आहेत.
सततच्या हवामान बदलाला आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आपत्तींना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना मुलभूत नुकसान भरपाईची
मदत केली जात नाही. त्यांनी धीर द्यायला सरकारकडून कुणीही जात नाही. खोके सरकार फक्त बॅनरवर दिसतं.
हे खरोखरच भयावह आहे.

एकीकडे शहरं लुटली जात आहेत, दुसरीकडे ग्रामीण भागाला कुठलीच मदत मिळत नाही आणि गुन्हेगार मात्र मोकाट
सुटले आहेत. एका आमदाराचा मुलगा एका व्यावसायिकाचं अपहरण करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला,
परंतु आजवर कोणतीही कारवाई केली गेलेली नाही. आणखी एक आमदार गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक
रोखताना कॅमेरात पकडला आणि त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याची बातमीही आपण ऐकली.
त्याच आमदाराला उद्दामपणाचं कौतुक म्हणून, आता सिद्धिविनायक गणेश मंदिर ट्रस्टचं अध्यक्ष बनवण्यात आलं आहे.
एका हिंदू सणात बंदुकीचा धाक दाखवून घाबरवणाऱ्या माणसाला अध्यक्ष केलं जातं. हे हिंदुत्व तुम्ही-आम्ही,
आपण स्वीकारणार आहोत का? असे ठाकरे यांनी जनतेला या प्रश्नातून विचारले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Breastfeeding Tips For Beginners | तुम्ही पहिल्यांदाच आई झाला आहात, तर जाणून घ्या स्तनपान करण्यापूर्वी त्याचे फायदे आणि तोटे…

Foods For Stamina | स्टॅमिना वाढवण्यासाठी खा ‘हे’ 4 पदार्थ, कमी होईल पोट आणि कंबरेची चरबी…!

Pune Police MCOCA Action | हडपसर परिसरात वाहनांची तोडफोड करणाऱ्या सुरज उर्फ चुस मोहिते टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 109 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA