Uday Samant | ‘राणेंच्या मंत्रिपदाने शिवसेना आणखी त्वेषाने वाढेल’

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Cabinet Expansion) नुकताच विस्तार करण्यात आला. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महाराष्ट्रातून भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांची मंत्रिपदावर वर्णी लागली. शिवसेनेला (Shivsena) शह देण्यासाठी नारायण राणे यांना मंत्रिपद देण्यात आल्याची चर्चा सुरु झाली. यानंतर शिवसेनेच्या नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. यावरुन शिवसेनेचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी मत व्यक्त केलं आहे. नारायण राणे यांना मंत्रिपद दिल्याने शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही. उलट आता शिवसेना महाराष्ट्रात अधिक त्वेषाने वाढेल, जोमाने काम करेल, असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी व्यक्त केलं आहे.

जाणीवपूर्वक वावड्या उठवल्या जात आहेत

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या वतीने यवतमाळ जिल्हा (Yavatmal district) प्रशासनाला 8 व्हेंटिलेटर सोपवून त्यांचे लोकर्पण करण्यासाठी उदय सामंत शुक्रवारी यवतमाळ येथे आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेचे कट्टर टीकाकार असलेले नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. त्यामुळे मुंबई आणि कोकणात शिवसेनेला फटका बसेल अशा वावड्या जाणीवपूर्वक उठवल्या जात आहेत. प्रत्यक्षात जेव्हे-जेव्हा शिवसेनेला अशा पद्धतीने डिवचण्यात येते, तेव्हा शिवसैनिक अधिक जोमाने कामाला लागतो, असे सामंत यांनी म्हटले.

हे व्हेंटिलेटर बिघडणार नाहीत, केंद्राला टोला

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी दिलेले व्हेंटिलेटर (Ventilator) बिघडणार नाहीत. कारण हे व्हेंटिलेटर केंद्राने पाठलेल्या व्हेंटिलेटरप्रमाणे कामचलाऊ नाहीत. केंद्राने यवतमाळ (Yavatmal) येथे पाठवलेल्या 35 पैकी 21 व्हेंटिलेटर सुरु आहेत. तर उर्वरित 14 खराब निघाले. हीच परिस्थिती केंद्राने इतर जिल्ह्यात पाठवलेल्या व्हेंटिलेटरची आहे, अशी टीका सामंत यांनी केंद्र सरकारवर केली.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : shiv sena will be bigger rane getting ministerial post says uday samant

 

हे देखील वाचा

Anti Corruption Trap | साडे सात लाख रुपयांच्या लाच प्रकरणी पोलीस निरीक्षकासह
2 अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात; राज्य पोलीस दलात खळबळ

पोलीस निरीक्षक संपत पवार यांची या पूर्वी पुण्यातील गुन्हे शाखेत आणि
दत्तवाडी पोलीस ठाण्यात नोकरी झाली आहे

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलावर पुन्हा मोठा अपघात;
ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने 8 वाहनांचे नुकसान