शिवसेना पदाधिकाऱ्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन – जातेगावातील शाखाप्रमुखासह अनेक युवकांनी राष्ट्रवादी काॅंंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेला परिसरातून धक्का बसलाय. तर राष्ट्रवादी काॅंग्रेसची ताकद वाढली आहे.

जातेगाव बुद्रुक ता. शिरूर येथील युवक कार्यकर्ते व शिवसेना शाखा प्रमुख हमीदभाई पठाण, दादासाहेब पवार, यश पवार यांसह आदी युवक कार्यकर्त्यांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करणार असून युवकांचे संघटन करून युवक संघटना मजबूत करणार असल्याचे हमीदभाई पठाण यांनी सांगितले.

यावेळी प्रवेश करणाऱ्या युवकांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीपराव वळसे पाटील, माजी आमदार सुर्यकांत पलांडे, पोपटराव गावडे, माजी सभापती प्रकाश पवार, मानसिंग पाचुंदकर, सुभाष उमाप, जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, पुणे जिल्हा विकास मंचचे अध्यक्ष सदाशिव पवार, शंकर जांभळकर, केशरताई पवार, राष्ट्रवादीचे आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष अमोल जगताप, नागेश खळदकर यांसह आदी उपस्थित होते.