Shivaji Adhalarao Patil | आढळरावांचं खा. अमोल कोल्हेंना आव्हान; म्हणाले – ‘बैलगाडा शर्यतीच्या पहिल्या बारीत घोडीवर बसण्याचा शब्द पाळा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shivaji Adhalarao Patil | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) खासदार अमोल कोल्हे (MP Dr Amol Kolhe) यांनी माझ्या गावातील घाटात येऊन घोडीवर बसावं आणि निवडणुकीच्या प्रचारात दिलेला तो शब्द सत्यात उतरवावा, असं मोकळं आव्हान शिवसेना नेते आणि माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalarao Patil) यांनी खा. कोल्हेंना दिलं आहे. पुण्यातील (Pune News) आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी या त्यांच्या गावातील घाटातून आढळराव पाटलांनी कोल्हेना निमंत्रण दिलं आहे.

 

खा. अमोल कोल्हे यांनी 2019 च्या लोकसभा प्रचारादरम्यान सुप्रीम कोर्टाचा लढा जिंकून ईन अन् शर्यतीच्या पहिल्याच बारीत मी स्वत: घोडीवर बसेन’, असं आश्वासन दिलं होतं. दरम्यान, परवानगी मिळाली तरी अमोल कोल्हे अजुनही कुठल्याच शर्यतीच्या घाटावर आले नाहीत. या दरम्यान आता मावळ तालुक्यासह शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalarao Patil) यांच्या गावामध्ये शुक्रवारी पुण्यातील (Pune) प्रथम शर्यत भरली आहे.

 

दरम्यान, त्यावेळी खासदार कोल्हे यांचा फोटो आपण फ्लेक्सवर छापला नाही, महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) धर्म का पाळला नाही, असा सवाल माध्यमांनी आढळराव यांना केला.
त्यावेळी आढळरावांनी अधिकचं बोलणं टाळलं.
मात्र दोन दिवसीय शर्यतीच्या पहिल्या दिवसाची सांगता होताना, ते शर्यतीत सहभागी झालेल्यांचे आभार मानत होते.

दरम्यान, शिवाजी आढळराव पाटलांनी लोकसभेच्या प्रचाराची आठवण करून देत.
”मी कोल्हे यांना निमंत्रण आधी ही दिलंय, आत्ताही देतोय. त्यांनी पहिल्या बारीला घोडीवर बसण्याचं आश्वासन पूर्ण करावं.
यासाठी का होईना त्यांनी माझ्या गावात यावं आणि बैलगाडा शौकिनांना दिलेला शब्द पूर्ण करावं,” असं खुलं आव्हानच त्यांनी दिलंय.

 

Web Title :- Shivaji Adhalarao Patil | shivaji adhalrao patil challenge to amol kolhe says ride a horse in the first round of a bullock cart race

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा