Shivajirao Adhalrao Patil | ‘आमदार अशोक पवार धमकीप्रकरणी गृह खात्याने सखोल चौकशी करावी’ – शिवाजीराव आढळराव पाटील

पोलीसनामा ऑनलाइन –  Shivajirao Adhalrao Patil | शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार (NCP MLA Ashok Pawar) यांना निनावी पत्राद्वारे दिलेल्या धमकीवरुन शिवसेना नेते (Shiv Sena) व शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अशोक पवार यांच्या जिवीतास धोका असले बाबत निनावी पत्राद्वारे धमकी येणे ही दुर्दैवी गोष्ट आहे. समाजामध्ये अशा प्रवृत्ती वाढत चालल्या असून वेळीच अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी गृह खात्याने सखोल चौकशी करावी, याबाबत मागणी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलीय. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

आमदार अशोक पवार (MLA Ashok Pawar) यांची व त्यांच्या पत्नी व पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सुजाता अशोक पवार (Sujata Ashok Pawar)
यांची निनावी पत्राव्दारे बदनामी करुन आमदार अशोक पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
ही धमकी रविवारी (17 ऑक्टोबर) रोजी दिली आहे. यांच्यासह शहरातील काही लोकांना निनावी पत्र आले आहे.
दरम्यान, यानंतर आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी मागणी केली आहे.

शिरुर नगरपरिषद सभागृह नेते प्रकाश धारीवाल (Prakash Dhariwal) यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेत चांगल्या पध्दतीने पारदर्शी कारभार चालू
असल्याचे सांगून अमेरिकेत बोस्टन येथे पाहिलेल्या इमारतीप्रमाणे ही शिरूर नगरपरिषदेची प्रशासकीय इमारत असल्याचे सांगून कामाचे कौतुक
शिवाजीराव आढळराव पाटलांनी केले आहे.
दरम्यान, त्यावेळी तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकांबाबत स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून पक्ष पातळीवर निर्णय घेणार
असल्याचे आढळराव पाटील यांनी म्हटले आहे.

 

Web Title: Shivajirao Adhalrao Patil | shirur haveli ncp mla ashok pawar threat case shivajirao adhalarao patil demanding enquiry towards home department

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sachin Sawant | काँग्रेसच्या सचिन सावंत यांचा थेट सोनिया गांधींना पत्र लिहून राजीनामा

Pune News | ‘जे मिळेल त्यामध्ये खूष’ राहाणार्‍या रिपाइंची ‘महापौर’ पदाची मागणी केवळ दबावतंत्राचा भाग !

Gold Price Today | दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात वाढीचे सत्र सुरू, चांदीही महागली, जाणून घ्या आजचे नवीन दर