Shivdi Magistrate Court | शिवडी कोर्टाचे उद्धव ठाकरे, संजय राऊतांना समन्स; 14 जुलैला हजर राहण्याचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shivdi Magistrate Court | मुंबईतील शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने (Shivdi Magistrate Court) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. शिंदे गटाचे नेते आणि खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांच्याविरोधात सामना मुखपत्रातून बदनामीकारक खोटी बातमी केल्याप्रकरणी शेवाळेंनी दाखल केलेल्या मानहानीच्या अर्जावर न्यायालयाने हे समन्स बजावले आहे.

29 डिसेंबर 2022 रोजी सामना मुखपत्राच्या प्रकाशित एका लेखात खासदार शेवाळे यांचे दुबई, पाकिस्तानातील कराचीत रिअल इस्टेटमध्ये (Real Estate) हितसंबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. यावर शेवाळेंनी वकील चित्रा साळुंखे (Lawyer Chitra Salunkhe) यांच्या मार्फत 3 जानेवारी 2023 रोजी नोटीस पाठवून या लेखातील दाव्यांचा स्त्रोत काय? अशी विचारणा केली होती. त्यावर, एका महिलेने इंटरनेटवर केलेला दावा आणि अन्य माहितीच्या आधारावर हा लेख लिहील्याचे सामनाकडून प्रत्युत्तरात सांगण्यात आले. (Shivdi Magistrate Court)

या उत्तरानंतर शेवाळेंनी दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी मानहानीची तक्रार (Complaint For Criminal Defamation) दाखल केली आणि मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावाही दाखल केला. दंडाधिकारी न्यायालयाने ट्रॉम्बे पोलिसांना (Trombay Police) फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 202 अंतर्गत तपास करण्याचे आदेश दिले. तर दुसरीकडे, पोलिसांनी शेवाळेंना बोलावून त्यांचा जबाबही नोंदवला. ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेला मूळ लेख हा पुरावा म्हणून शेवाळेंनी सादर केला.

Web Title : Shivdi Magistrate Court | shivdi magistrate court summed uddhav thackeray and sanjay raut in defamation case filed by mp rahul shewale

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा