रांगोळीतून साकारला शिवराज्याभिषेक सोहळा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – कलारंग अकादमीच्या विद्यार्थ्यांनी तीन दिवसीय रांगोळी प्रदर्शनामध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याचे चित्र साकारले आहे. 13 विद्यार्थ्यांनी मिळून 9 बाय 11 फुट या आकाराचे हे चित्र साकारले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचे भव्य चित्र रांगोळीतून रेखाटले पाहून साक्षात राज्य अभिषेक सुरू आहे, असे दिसते. शिवराज्याभिषेक सोहळ्याचे सुंदर चित्र रेखाटण्यासाठी 34 तासांचा कालावधी लागला आहे.

चित्रकार सुजाता औटी, दुर्गा कानवडे, श्रावणी वाघस्कर, पुर्वा भंडारी, वैष्णवी जाधव, सई शिंदे, वेदश्री कुलकर्णी, राजवीर पिसोरे, अनुश्री चव्हाण, प्रचीती कुलकर्णी, प्रेरणा बागरेचा, करुणा बागरेचा, नशरा शेख यांनी मेहनत घेऊन सदरचे चित्र पूर्ण केले. हे आकर्षक शिवराज्याभिषेकचे रांगोळीतून साकारलेले चित्र सर्वांना पाहण्यासाठी 20 मे ते 22 मेपर्यंत कमलाबाई नवले हॉल, गुलमोहर रोड, सावेडी अहमदनगर येथे पाहण्यास मिळेल. सदर विद्यार्थ्यांना शिक्षिका सुजाता पायमोडे यांनी मार्गदर्शन केले.