Shivsena Chief Uddhav Thackeray | संतोष बांगरांना शह देण्यासाठी टाकलेला डाव फसणार?, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयामुळे शिवसेनेत पुन्हा दुफळी

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेने मोठे बंड झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करुन पक्षाची पुन्हा बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर (Rebel MLA Santosh Bangar) यांच्या बंडानंतर हिंगोली जिल्ह्यात (Hingoli District) शिवसेना बळकट करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी नुकतीच हिंगोली जिल्हाप्रमुख पदावर नव्या नेत्याची निवड केली. मात्र, उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांच्या निर्णयावरुन पक्षातील निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये नाराजी (Shivsainik) पसरली आहे. नाराज झालेल्या शिवसैनिकांनी एकत्रित येत हिंगोली येथे शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखाची (District Chief) निवड (Selection) करताना निष्ठावंतांना डावल्याचा आरोप केला आहे.

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले विनायक भिसे पाटील (Vinayak Bhise Patil) यांची जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती केली. तसेच काही वर्षापूर्वी पक्षात आलेल्या संदेश देशमुख (Sandesh Deshmukh) यांनाही जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या दोन नियुक्त्यांमुळे मागील अनेक वर्षापासून शिवसेनेत काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

 

संतोष बांगर यांना टक्कर देण्याच्या प्रयत्ना उद्धव ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांची नाराजीही ओढावून घेतली असल्याचे बोललं जात आहे.
परमेश्वर मांडगे (Parameshwara Mandge) आणि रमेश शिंदे (Ramesh Shinde) यांना जिल्हाप्रमुखपदाचे वेध लागले आहेत.
त्यामुळे आगामी काळात नाराज निष्ठावंत शिवसैनिक नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच या नाराज पदाधिकाऱ्यांची नाराजी उद्धव ठाकरे कशा प्रकारे दूर करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

 

Web Title :- Shivsena Chief Uddhav Thackeray | party workers are upset after shivsena chief uddhav thackeray appointed sandesh deshmukh as hingoli district chief

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tata Steel | ट्विन टॉवर पाडणार्‍या कंपनीचे लक्ष आता टाटा स्टीलवर, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण…

 

Ramdas Kadam | ‘मातोश्रीवर किती खोके गेले माहिती, तोंड उघडायला लावू नका’, रामदास कदमांचा इशारा

 

Pune Crime | FTII मध्ये शिकणाऱ्या 25 वर्षीय तरुणीची आत्महत्या, महिन्याभरातील दुसरी घटना