Shivsena Leader Sanjay Pawar | शिवसेना नेत्याचं कोल्हापुरात विधान, म्हणाले – ‘बाप हा बाप असतो, त्यात जुना बाप आणि नवा बाप असे काही नसते’

कोल्हापूर: पोलीसनामा ऑनलाइन – Shivsena Leader Sanjay Pawar | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagar Singh Koshyari) यांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) राज्यपालांवर टीका करत असून, त्यांना पदावरुन हटविण्याची मागणी करत आहे. कोल्हापूरात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार (Sanjay Pawar) यांनी राज्यपालांच्या विरोधात निषेध आंदोलन केले. यावेळी संजय पवार (Sanjay Pawar) यांनी राज्यपालांचा निषेध करत, बाप हा शेवटी बापच असतो असे त्यांनी म्हंटले आहे. (Shivsena Leader Sanjay Pawar)

आम्ही महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही. छत्रपती शिवाजी राजे आमचे आदर्श आहेत, आमचे दैवत आहेत. भाजपाची काही मंडळी जाणीवपूर्वक वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत आहेत. भविष्यात भगतसिंह कोश्यारी किंवा सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) कोल्हापूरात आले, तर कोल्हापूर बंद ठेऊन आम्ही त्यांचे स्वागत करू. ‘बाप हा शेवटी बापच असतो. छोटा बाप किंवा मोठा बाप, जुना बाप किंवा नवीन बाप ही आमची संकल्पना नाही’. त्यांची अशी काही संकल्पना असेल, तर माहित नाही, असे यावेळी संजय पवार (Shivsena Leader Sanjay Pawar) यांनी सुनावले.

राज्यपालांच्या टीकेवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती
(Sambhajiraje Chatrapati) यांनी देखील कोल्हापूरातून राज्यपालांवर टीका केली आहे.
कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदींनी महाराष्ट्राची आणि सर्व शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे.
फडणवीसांनी त्यांचे समर्थन करु नये. फडणवीसांनी त्यांना माफी मागण्यास सांगावे, असे संभाजीराजे म्हणाले.

तर साताऱ्याचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) म्हणाले, भगतसिंह कोश्यारी यांना आता विस्मरण होत असून, त्यांची रवानगी वृद्धाश्रमात केली पाहिजे.
कोश्यारींवर कारवाई केली नाही, तर मी माझ्या पद्धतीने योग्य वेळ आल्यावर माझी भूमिका जाहीर करेन.
राज्यातील प्रत्येक पक्ष शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय राजकीय किंवा सामाजिक कार्याला सुरुवात
करत नाही. देशाला एकत्रित ठेवायचे असेल, तर शिवाजी महाराजांचे विचार जपावे लागतील.
अन्यथा, भविष्यात देशाचे तुकडे होतील. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना
पक्षातून हटवावे. तसेच सरकारला जमत नसेल, तर त्यांची जीभ कशी हासडायची ते मी माझ्या पद्धतीने बघतो,
असे म्हणत उदयनराजे भोसलेंनी सुधांशू त्रिवेदी आणि राज्यपालांना इशारा दिला आहे.

Web Title :-  Shivsena Leader Sanjay Pawar | shivsena leader sanjay pawar criticize bhagat singh koshyari bjp over chhatrapati shivaji maharaj remark