Shivsena MLA Disqualification | सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना पुन्हा कठोर शब्दात सुनावले, डेडलाईन दिल्याने मोठा धक्का!

नवी दिल्ली : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील (Shivsena MLA Disqualification) निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत घ्या, असे निर्देश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjay Chandrachud) यांनी आजच्या सुनावणीत दिले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सुद्धा ३१ जानेवारीपर्यंत द्यावा, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने अशाप्रकारे थेट तारीखच सांगितल्याने आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांना शिवसेना आमदार अपात्रतेसंबंधीचा (Shivsena MLA Disqualification) निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत घ्यावाच लागणार आहे.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रतेबाबत निर्णय घेण्यास सांगितले होते. मात्र, यासाठीच्या प्रक्रियेस विलंब लावला जात असल्याने दोन ते तीन वेळा न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना कठोर शब्दात सुनावले होते.

मागील सुनावणीत सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना नवे वेळापत्रक सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु, आज जे नवीन वेळापत्रक अध्यक्षांनी सादर केले त्यानुसार आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण होण्यासाठी ४ ते ५ महिन्यांचा कालावधी लागणार होता. यावरून न्यायालयाने नाराजी व्यक्त करत थेट तारीख सांगितली.

न्यायालयाने अध्यक्षांनी सादर केलेले नवे वेळापत्रक फेटाळले आणि थेट हस्तक्षेप करत कोणत्याही परिस्थितीत ही सुनावणी ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश दिले.

हे निर्देश देताना सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांना पुन्हा एकदा परखड शब्दात सुनावले.
वेळोवेळी संधी देऊनही विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला नाही. याबाबत सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली.
न्यायालयाने म्हटले, शिवसेना पक्ष कोणाचा आणि शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतची
(Shivsena MLA Disqualification) सुनावणी ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करा.

सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) हे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह राज्यातील
महायुती सरकारसाठी मोठा धक्का आहे. कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे आता ३१ डिसेंबरपर्यंत अध्यक्षांना निर्णय घ्यावाच
लागणार आहे. यामुळे नवीन वर्षात राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | होम ग्राऊंडवर नामुष्की! अजित पवारांच्या पोस्टरला फासले काळे

Pune Drug Case | ललित पाटील पलायन प्रकरण : ससून रुग्णालयाचे डीन मेहरबान असल्याचा पुरावा आला समोर