Shivsena Shinde Group | मुंबई महापालिकेत राडा, पालिकेतील सेनेच्या कार्यालयावर शिंदे गटाचा दावा; नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी (VIDEO)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई महापालिकेमध्ये (Brihanmumbai Municipal Corporation (BMC) शिवसेनेचा शिंदे गट (Shivsena Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) यांच्यात जोरदार राडा झाला. मुंबई महापालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयावर (Party Office) बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने ताबा मिळवला आहे. मुंबई बाळासाहेबांच्या शिवसेनेची (Balasaheb’s Shiv Sena) असा दावा शिंदे गटाचे (Shivsena Shinde Group) खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी केला आहे.

यावेळी शितल म्हात्रे (Sheetal Mhatre), नरेश म्हस्के (Naresh Mhaske), यशवंत जाधव (Yashwant Jadhav), अशोक जाधव (Ashok Jadhav)आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते.

विधानसभेतील पक्ष कार्यालयावर शिंदे गटानं (Shivsena Shinde Group) ताबा मिळवल्यानंतर आता शिंदे गटाने मुंबई महापालिकेतील कार्यालयावरही ताबा मिळवला आहे. शिंदे गटाचे पदाधिकारी मुंबई महापालिकेत आले त्यांनी शिवसेना पक्ष कार्यालयात घुसून ताबा घेतला. यावेळी शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आला. यावेळी दोन्ही गटांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांना बाहेर काढले. यामुळे मुंबईतील राजकारण चांगलेच पेटले आहे. दोन्ही गटात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सध्या महापालिकेत आणि बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आमच्याकडे संख्याबळ जास्त आहे. तसेच पदाधिकाऱ्यांची संख्याही आमच्याकडे जास्त आहे, त्यामुळे हे कार्यालय आपल्याला मिळावं अशी मागणी शिंदे गटाने आयुक्तांकडे केली. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ संपलेला आहे.
या कार्यालयाच्या बाहेरच्या पाटीवर यशवंत जाधव यांचं नाव झाकून ठेवण्यात आलं होतं.
या नावावर लावेली पट्टी शिंदे गटाने काढून टाकली. यशवंत जाधव यांच्याकडेच हे कार्यालय होतं,
पण ते त्यांना मिळत नव्हत. अखेर त्यांनी या कार्यालयावर ताबा मिळवला आहे.

किशोरी पेडणेकर-नरेश म्हस्के मध्ये खडाजंगी

शिवसेनेच्या कार्यालयावर ताबा मिळवल्यानंतर शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि मुंबईच्या
माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
अशाप्रकारे कार्यालयावर कब्जा करणं चुकीचं असल्याचे पेडणेकर म्हणाल्या. तर आमच्याकडे संख्या जास्त आहे.
त्यामुळे या कार्यालयावर आमचाच दावा असल्याचे म्हस्के म्हणाले.

Web Title :-  Shivsena Shinde Group | shinde camp claims bmc office rada between shivsainiks in bmc headquarter watch video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | अजित पवार मोबाईल बंद ठेवून ८-८ दिवस गायब होतात; अजित पवारांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचे पलटवार…

Devendra Fadnavis | ‘हा पहिलाच विरोधी पक्ष आहे, जो स्वत:च्या काळातले घोटाळे बाहेर काढत आहे’, देवेंद्र फडणवीस यांचा खोचक टोला (व्हिडिओ)