Shivsena UBT | शिवसेनेचे मोदी सरकारला आव्हान, हिंमत असेल तर लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या

मुंबई : Shivsena UBT | नुकत्याच झालेल्या चार राज्यातील निवडणुकांचा निकाल अनपेक्षित लागल्याचे म्हणत शिवसेना (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करणारे वक्तव्य केले आहे. इतकाच आत्मविश्वास असेल आणि हिंमत असेल तर उद्या होणारी लोकसभेची एकच निवडणूक देशभरात बॅलेट पेपरवर घेऊन जिंकून दाखवा, असे थेट आव्हान ठाकरे यांनी मोदी सरकारला (Modi Govt) दिले आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, तुमची एवढी लाट आहे, तर त्या लाटेमध्ये एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा. म्हणजे आमच्या मनात शंका नको. सगळे वातावरण विरोधात असताना आणि एक्झिट पोल जे येत होते, ते उलटे-पालटे करणारे निकाल लागत असताना, हे कसे घडले, असा प्रश्न पडणार असेल तर मनातील शंका दूर करण्यासाठी निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या.

(Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना (Shivsena UBT) कितीही फोडायचा प्रयत्न केला, तिला प्रशासनातून बाजूला काढायचा प्रयत्न केला, तरी शांत राहणार नाही. देशातील पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या. भाजपला भरघोस यश मिळाले. माझे आव्हान आहे की, पहिल्यांदा मुंबई महापालिकेची निवडणूक घ्या. ही निवडणूक वर्ष ते दीड वर्षे पुढे ढकलली आहे. सिनेटची निवडणूक लांबवली जात आहे.

उद्धव पुढे ठाकरे म्हणाले, लोकसभा ही देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या
तर मतमोजणीसाठी वेळ लागेल हे मान्य आहे. मात्र, स्थानिक निवडणुका ज्या पद्धतीने लांबवल्या जात आहेत,
त्यापुढे मतमोजणीसाठी लागणारा विलंब काहीच नाही. मतमोजणीसाठी दोन ते तीन दिवस लागले तर काय फरक पडतो.

केंद्र सरकारला आव्हान देताना ते पुढे म्हणाले, तुमच्यात एवढा आत्मविश्वास असेल आणि हिंमत असेल तर उद्या
होणारी लोकसभेची एकच निवडणूक देशभरात बॅलेट पेपरवर घेऊन जिंकून दाखवा.
अथवा मुंबई महापालिकेची निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावा.
हा विषय मुंबईकरांच्या गळ्याशी आलेला आहे आणि हा फास तोडल्याशिवाय शिवसेना गप्प राहणार नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुतण्याकडून पाऊण कोटींची फसवणूक, पुण्यातील प्रकार

पुण्यातील वाकडा पुल येथील खुनाच्या प्रयत्नातील चार आरोपींची निर्दोष मुक्तता

Sanjay Raut | इंडिया आघाडीची उद्या दिल्लीत बैठक, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार, ‘हे’ नेते नाराज, संजय राऊतांनी दिली माहिती