मुंबई : शिवसेना (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून सरकार आणि विकासक अदानी समूह (Adani Group) यांच्याविरोधात मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. या मुद्द्यावर शिवसेना आक्रमक झाली आहे. भाजपा (BJP) नेतृत्वाच्या जवळचे उद्योगपती असलेल्या अदानींच्या विरोधात शिवसेना (Shivsena UBT) रस्त्यावर उतरल्याने भाजपाकडून कोणती प्रतिक्रिया येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवालय या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, धारावीचा पुनर्विकास करताना पहिल्यांदा नीट सर्वे झाला पाहिजे. दडपशाहीने सर्वे झाल्यास शिवसेना असा सर्वे हाणून पाडेल. शिवसेना आज प्रशासनात नाही. पण शिवसेनेची ताकद ही सरकारमध्ये असण्यात वा नसण्यात नसून शिवसेनेची ताकद रस्त्यावर आहे. सरकारला व अदानींना जाब विचारण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, धारावीचा पुनर्विकास हा लोकांच्या नाही तर गौतम अदानी यांच्या फायद्यासाठी केला जात आहे. धारावीत राहात असलेल्या लोकांचे धारावीतच पुनर्वसन व्हावे, अशी आमची मागणी आहे. धारावीला स्पेशल प्रोजेक्ट म्हणून जाहीर केले आहे आणि ३०० स्क्वेअर फूट जागा देणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र पुनर्विकास करत असताना धारावीकरांना ४०० ते ५०० स्क्वेअर फूट एवढी जागा मिळायला हवी. (Shivsena UBT)
उद्धव ठाकरे म्हणाले, धारावीला आज सोन्यापेक्षा जास्त भाव आला आहे, त्यामुळे आज सगळ्यांची नजर धारावीवर आहे.
धारावीमध्ये धारावीकरांना घर मिळालीच पाहिजेत, पण सोबतच गिरणी कामगार, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांनाही तिथे घरे देण्यात यावीत.
या प्रकल्पाच्या टीडीआरबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, टीडीआरबाबतही गोंधळ आहे.
इतर विकासकांनाही टीडीआर घ्यायचा असेल तर ४० टक्क्यांची अट टाकत तो टीडीआर अदानींकडूनच विकत घ्यावा लागेल.
मात्र यासाठी एक वेगळी कंपनी स्थापन करावी. बीडीडी चाळींचा विकास म्हाडाकडून केला जातो, तसा धारावीचा
विकास सरकारने करावा. टीडीआर सरकारकडून विकत घेतला गेला पाहिजे. अदानींचा विकास कसा होईल, याचा विचार
या सगळ्यात गेला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, हे सरकार केवळ कंत्राटदारांच्या फायद्यासाठी काम करत आहे.
नियोजनशून्य कामामुळे मुंबईकरांचा जीव घुसमटत आहे. आजपर्यंत एवढे प्रदूषण कधीही पाहिले नव्हते.
मुंबईतील इतरही तीन मोठे प्रकल्प यांच्याच घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मुंबई ही मराठी माणसाने रक्त सांडून मिळवलेली आहे. आम्हाला मुंबई कोणी आंदण म्हणून दिलेली नाही.
त्यामुळे आम्हीही आमची मुंबई कोणाला आंदण म्हणून जाऊ देणार नाही.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
पुतण्याकडून पाऊण कोटींची फसवणूक, पुण्यातील प्रकार
पुण्यातील वाकडा पुल येथील खुनाच्या प्रयत्नातील चार आरोपींची निर्दोष मुक्तता