Shivsena Uddhav Thackeray Group | कोल्हापूरचे मैदान मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचा नवा मल्ल; वंचितचे हाजी अस्लम सय्यद शिवबंधनात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात (Shivsena Uddhav Thackeray Group) केलेल्या बंडामुळे कोल्हापूर (kolhapur) जिल्ह्यात शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन शिवसेना खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. तसेच, तेथील शिवसेना (Shivsena Uddhav Thackeray Group ) आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार राजेश क्षीरसागरसुद्धा एकनाथ शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली होती. त्यातच जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघावर भाजपकडून (BJP in Kolhapur) विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. भाजपने आतापर्यंत दोन केंद्रीय मंत्री इथे दौऱ्यावर पाठवले होते. त्यामुळे शिंदे गटात गेलेले खासदार मंडलिक आणि धैर्यशील माने यांना भाजप चिन्हावर लढणार की, भाजपचा त्यांचा स्वतंत्र उमेदवार उभा करणार यावर अजूनही स्पष्टता नाही.

आता कोल्हापुरात शिवसेनेची दावेदारी मजबूत करण्यासाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने वंचित बहुजन आघाडीचे 2019 मधील कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हाजी अस्लम सय्यद यांना त्यांच्या गटात सामील करून घेतले आहे. त्यांचा शिवसेना प्रवेश उद्धव ठाकरेंच्या (Shivsena Uddhav Thackeray Group) उपस्थितीत झाला. वंचित बहुजन आघाडीकडून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उभे राहून त्यांनी सव्वा लाखांवर मते मिळवली होती. त्यानंतर हाजी अस्लम चर्चेत आले होते.

हाजी अस्लम यांची लोकसभेतील कामगिरी अनपेक्षित होती.
त्यांना मिळालेल्या मतांमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी पडले, असे मानले जाते.
त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला याचा कितपत फायदा होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Web Title :- Shivsena Uddhav Thackeray Group | vba leader haji aslam sayyad joins shivsena in presence uddhav thackeray hatkanangale kolhapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jitendra Awhad | ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या दृश्यावर जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप; म्हणाले – “मराठी माणसाला येड्यात काढताहेत”

Pune Band News | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात पुणे बंदची हाक ! विविध पक्ष व संघटनांतर्फे 13 डिसेंबरला पुणे बंद आंदोलन