Shivsena Uddhav Thackeray Mission BMC | ‘मिशन बीएमसी’साठी शिवसेनेने आखली खास रणनीती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Shivsena Uddhav Thackeray Mission BMC | काही दिवसांवर मुंबई महापालिकेची निवडणूक येऊन ठेपली आहे. त्यातच आता शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी (Elections of Mumbai Municipal Corporation) शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांनी मुंबईमध्ये गटप्रमुखांच्या मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात त्यांनी बूथ जिंका निवडणूक जिंका, असा कानमंत्र उद्धव ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना यावेळी दिला आहे. शिंदे गट आणि भाजप (BJP) विरोधात उद्धव ठाकरेंनी आक्रमक रणनीती आखली आहे. (Shivsena Uddhav Thackeray Mission BMC)

उद्धव ठाकरे यांनी यंदाच्या महापालिका निवडणुकीसाठी भाजपसारखी रणनीती आखली आहे. भाजपनेही 2014 पासून पन्ना प्रमुख आणि बूथ प्रमुख नेमून या प्रमुखांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. भाजपच्या या रणनितीचा फायदा त्यांना मोठ्या प्रमाणावर झाला. उद्धव ठाकरे यांनीही अशाचप्रकारे बूथ जिंका, निवडणूक जिंका, अशी रणनीती अवलंबली आहे.

तसेच काही दिवसांवर दसरा मेळावा (Dussra Melava) येऊन ठेपला आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे
शिवसैनिकांना काय आवाहन करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घ्यायला मुंबई महापालिकेने अजूनही ठाकरेंना परवानगी दिलेली नाही.
हि परवानगी मिळावी यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Web Title :- Shivsena Uddhav Thackeray Mission BMC | uddhav thackeray mission bmc tells shivsainiks to concentrate on booth

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Latur ACB Trap | अर्जित रजा मंजूर करण्यासाठी 6 हजार रुपये लाच घेताना मुख्याध्यपक आणि लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Uddhav Thackeray Rally | उद्धव ठाकरेंच्या सभेतील ‘त्या’ रिकाम्या खुर्चीची सर्वत्र चर्चा; शिवसेना नेमका कोणता संदेश द्यायचाय…