Latur ACB Trap | अर्जित रजा मंजूर करण्यासाठी 6 हजार रुपये लाच घेताना मुख्याध्यपक आणि लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – Latur ACB Trap | महिला शिक्षकाची एक आठवड्याची अर्जित रजा मंजूर (Earned Leave) करण्यासाठी 6 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) सदानंद प्राथमिक शाळेच्या (Sadananda Primary School) मुख्याध्यापक (Principal) आणि लिपीकाला (Clerk) लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (Latur ACB Trap) सापळा रचून ताब्यात घेतले. मुख्याध्यापक सुधाकर जगन्नाथ पोतदार Sudhakar Jagannath Potdar (वय-55) आणि लिपीक शशिकांत विठ्ठलराव खरोसेकर Shashikant Vitthalrao Kharosekar (वय-54) असे लाच घेताना ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई बुधवारी (दि.21) मुख्याधपक कार्यालयात करण्यात आली.

 

याबाबत 63 वर्षाच्या तक्रारदाराने लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Latur) मंगळवारी (दि.20) तक्रार केली. तक्रारदार यांच्या पत्नी सदानंद प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत. त्यांना एक आठवड्याची अर्जित रजा पाहिजे असल्याने त्यांनी रजेचा अर्ज दिला होता. रजा मंजूर करण्यासाठी तक्रारदार यांना शाळेत बोलावून घेऊन यांच्याकडे 7 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 6 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांनी लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी लातूर एसीबीकडे (Latur ACB Trap) तक्रार दिली.

 

लातूर एसीबीच्या पथकाने मंगळवारी पडताळणी केली असता लिपीक शशिकांत खरोसेकर
याने पंचासमक्ष 7 हजार रुपये लाच मागून तडजोडी अंती 6 हजार रुपये लाच मागितली.
लाचेची रक्कम शाळा सुटण्याच्या वेळेत मुख्याध्यापक यांच्या कार्यालयात पंचासमक्ष मुख्याध्यपक सुधाकर पोतदार यांच्यासमोर खरोसेकर याने स्विकारली.
खरोसेकर याने लाच स्विकारुन लाचेची रक्कम पोतदार यांच्याकडे दिली. पथकाने दोघांना रंगेहात पकडून लाचेची रक्कम जप्त केली.

ही कारवाई नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक परिक्षेत्राचे (Nanded ACB) पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे (SP Dr. Rajkumar Shinde),
अपर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण (Addl SP Dharamsingh Chavan),
लातूर एसीबीचे पोलीस उप अधीक्षक पंडीत रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली (Police Inspector Bhaskar Pulli),
पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर (Police Inspector Anwar Mujawar) यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Latur ACB Trap | Principal and clerk caught in anti-corruption net while taking Rs 6,000 bribe to grant earned leave

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

CBI ACB Trap | 1 लाखाची लाच घेताना पुण्यातील दूरसंचार विभागातील दोन बडे अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

Adv.Pravin Chavan | अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांची ‘विशेष सरकारी वकील’ म्हणून केलेली नियुक्ती रद्द

Maharashtra Politics | पक्षात बंडखोरी करणार्‍या शिंदे गटाची पक्षप्रमुखांनाच ऑफर; उद्धव ठाकरेंचे स्वागतच करू, पण अट एकच…