हिंगोली- परभणी मधून विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून विपुल गोपीकिशन बजोरीया

हिंगोलीः पोलीसनामा आॅनलाईन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकासाठी एकला चलो रे चा नारा दिल्यानंतर विधानपरिषदेसाठी हिंगोली-परभणी मतदार संघामधून विपुल गोपीकिशन बजोरीया यांच्या नावाची घोषणा केली आहे.

भाजप आणि शिवसेना यांच्यात वाढत्या मतभेदानंतर उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापुढे भाजपशी कोणत्याही प्रकारची युती करण्यात येणार नसल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. राज्यातील इतर ठिकाणी देखील विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी शिवसेनेने आपल्या स्वतंत्र उमेदावारांच्या नावाची घोषणा केली आहे.