पाकिस्तान सुपर लीगच्या गाण्यावर संतापलेला शोएब अख्तर म्हणाला – ‘माझी मुले घाबरली’

पोलिसनामा ऑनलाईन – पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर पीएसएल सॉन्ग अनेकदा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) फटकारताना ऐकले जाते. कधी संघाच्या खराब कामगिरीवर तर कधी त्याच्या खेळाडूंच्या वागणुकीवर. यावेळी कारण म्हणजे पाकिस्तानी सुपर लीग (पीएसएल) चे नवीन गाणं.आणि हे गाणं बनवणाऱ्या व त्या गाण्याला परवानगी देणाऱ्या पीसीबीच्या अधिकाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

 

 

 

 

 

शोएब अख्तरने एका व्हिडिओद्वारे त्याने या नवीन गाण्याची खिल्ली तर उडवलीच आहे, शिवाय तुम्हाला लाज वाटत नाही का असं गाणं बनवताना अशा शब्दात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची खरडपट्टी केली आहे. हे देखील सांगितले आहे की २०२१ च्या हंगामात तयार करण्यात आलेल्या गाण्यापासून त्यांची मुले घाबरली आहेत आणि ३ दिवसांपासून बोलत नाहीत. रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या या स्टार बॉलर शोएब अख्तरने सांगितले की, “तेथे उत्तम रचना किंवा कोणतेही विशेष गाणे नाही. ते कोणी केले याची लाज वाटली. पीसीबीने हा व्हिडिओ कसा मंजूर केला हे मला समजत नाही. मला सांगून मी एखादे चांगले गाणे तयार केले असते.

दरम्यान, गाण्यात वापरलेला शब्द Groove चा काय अर्थ होतो हे तरी माहित आहे का या शब्दाचा अर्थ नाली होतो, या शब्दाचा गाण्यात कसा काय वापर करु शकतात, असा प्रश्न विचारत त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला धारेवर धरलं आहे. तसेच पाकिस्तान सुपर लीगचा पहिला सामना २० फेब्रुवारीला होईल, तर २२ मार्च रोजी अंतिम सामना होणार आहे. करोना महामारी दरम्यान पहिल्यांदाच पाकिस्तानात प्रेक्षकांना २० टक्केच्या संख्येत प्रत्यक्ष स्टेडियममध्ये सामना पाहण्याची परवानगी असणार आहे.