धक्कादायक ! लैंगिक छळाच्या प्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सावत्र मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. सावत्र मुलीला उद्देशून अश्लिल बोलल्याचा आणि अश्लिल छायाचित्रे दाखविल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला असून समतानगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हिंदी मालिकांमध्ये प्रमुख भूमिका  करणाऱ्या अभिनेत्रीने काही वर्षापूर्वी एका व्यक्तीशी विवाह केला होता. या अभिनेत्रीला पहिल्या पतीपासून असलेली एक मुलगीही त्यांच्यासमवेत राहत होती. २०१७ पासून या अभिनेत्रीचा दुसरा पती त्याच्या १७ वर्षाच्या सावत्र मुलीशी अश्लिल संभाषण करीत.  तसेच तिला मॉडेलचे अश्लिल फोटो दाखवून गैरवर्तन करीत होता. त्याच्या या वागण्याला कंटाळून शेवटी या अभिनेत्रीने पोलिसांकडे धाव घेतली़ पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like