धक्कादायक ! SUV मध्ये बलात्कार करण्याएवढी जागा असते का? पोलिसांची RTO कडे विचारणा

अहमदाबाद : वृत्तसंस्था – दररोज बलात्काराच्या घटना घडत असता. एखाद्या महिलेवर किंवा मुलीवर बलात्कारासारखी घटना घडल्यानंतर पोलिसांना नको नको ते प्रश्न सूचतात. पीडितेला तिच्या यातनांपेक्षा पोलिसांकडून होत असलेल्या चौकशीचा अधिक त्रास सहन करावा लागतो. गुजरातमधील वडोदरा पोलीस सध्या एका बलात्काराच्या गुन्ह्याचा तपास करत आहेत. पीडित मुलीवर एका SUV मध्ये कसा बलात्कार होऊ शकतो असा प्रश्न गुजरात पोलिसांना पडला आहे. यामुळे याचे उत्तर त्यांनी थेट आरटीओकडून मागवले आहे.

वडोदरामध्ये एका नराधमाने तरुणीवर त्याच्या SUV गाडीत बलात्काराचा प्रयत्न केल्याची तक्रार पीडित तरुणीने पोलिसांकडे केली. याची चौकशी करायची सोडून पोलिसांना विचित्रच प्रश्न पडला आहे. पोलीस आरोपीला ताब्यात घेऊन कारवाई करायचे सोडून पोलीस SUV मध्ये बलात्कार करता येतो का याचे उत्तर शोधत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने वडोदराच्या आरटीओ अधिकाऱ्याला स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल (SUV) मध्ये बलात्कार करण्याऐवढी जागा असते का असा प्रश्न विचारला आहे. पोलिसांच्या या प्रश्नामुळे आरटीओचे अधिकारी देखील चक्रावले असून पोलिसांकडून अशा प्रकारचा प्रश्न विचारण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हा प्रकार टोयोटा फॉर्च्युनर एसयूव्ही कारमध्ये घडला आहे.

टोयोटा फॉर्च्युनर एसयूव्ही कारमध्ये बलात्कार करण्याइतकी जागा असते का ? एवढीच विचारणा पोलिसांनी केली नाही. तर सेंट्रल लॉकिंग सिस्टिमची देखील पोलिसांनी माहिती मागवली आहे. आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. एखाद्या बलात्काराच्या घटनेत वाहनाची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही टोयोटा फॉर्च्युनर एसयूव्ही कार एका बड्या पुढाऱ्याची आहे. भद्र पटेल असे या नेत्याचे नाव असून तो भाजी मंडई महामंडळाचा माजी अध्यक्ष होता. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे.

जर एखाद्या गुन्ह्यामध्ये गाडीचा वापर केला असेल तर पोलिस आरटीओकडून गाडीचे फिटनेस सर्टिफिकेटची माहिती मागवतात. मात्र, अशा प्रकारची विचारणा पहिल्यांदाच होत आहे. गाडीत किती जागा असते. या प्रश्नावर आरटीओने नाराजी व्यक्त केली आहे. गाडीच्या मागच्या सीटवर बलात्काराची घटना घडू शकते का असा प्रश्न पोलिसांनी विचारला आहे. तसेच तिच्यावर अत्याचार होत असताना तिने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न का केला नाही, यासाठी पोलिसांनी सेंट्रल लॉकिंग सिस्टिमची माहिती मागवली आहे.

नेमकं काय घडलं ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी भावेश पटेल आणि पीडित तरुणी एका तिसऱ्या मित्राच्या ओळखीने संपर्कात आले. पीडिता 26 एप्रिल रोजी एका फार्महाऊसवर पार्टीसाठी गेली होती. मात्र, रात्री पोलिसांचं गस्ती पथक तिथे पोहचले. सदर तरुणी बाजूलाच लपली आणि तिने तिच्या मित्राला फोन करुन आपल्याला तिथून नेण्यास बोलावले. मित्राने आरोपीला तिला घेण्यासाठी पाठवले. आरोपी भावेशने पीडितेला तिथून एका एसयूव्ही कार मधून घेऊन गेला. एका अज्ञात स्थळावर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने तरुणीला घरी सोडले. तसेच हा प्रकार कोणालाही न सांगण्याची धमकी दिली.