धक्कादायक… विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव ; युवतीची आत्महत्या

नांदेड : पोलीसनामा आॅनलाइन (माधव मेकेवाड) – विनयभंगाचा गुन्हा मागे घे म्हणून तगादा लावणाऱ्या आरोपींना कंटाळून मुलीने राहत्या घरावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. ही घटना नांदेड येथील असून याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

याबाबत सविस्तर माहिती, सहशिक्षक असलेले मारोती धोंडिबा साखरे हे निवृत्त व्यंकटराव गोपाळे (वय ६५) यांच्या घरी परिवारासह किरायाने राहत होते. साखरे यांची मुलगी वर्षा (वय १७) हिचा घरमालक गोपाळे यांनी विनयभंग केला होता. याप्रकरणी गोपाळे यांच्याविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार आणि विनयभंग या कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला होता.

वडिलांना केलेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी केला खुन 

घटनेनंतर मारोती साखरे यांनी ते घर सोडून राजनगर भागातील भगवान गायकवाड यांच्या घरी खोली घेवून राहत होते. त्यांची मुलगी वर्षा ही यशवंत महाविद्यालयात शिकत होती. घटनेनंतर व्यंकटराव गोपाळे आणि त्यांचा मुलगा चंद्रमुनी गोपाळे हे आमच्यावरील दाखल केलेला गुन्हा परत घे असे म्हणून धमकी देत असत. तसेच अनेकवेळा वर्षा हिच्या मैत्रिणीसमोर या दोघांनी तिचा विनयभंग केला. सतत होणाऱ्या छळाला कंटाळून वर्षा हिने २१ आॅक्टोबर रोजी घराच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेतली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती.

पिता-पुत्राकडून विनयभंग केल्यानंतर त्या प्रकरणातील गुन्हा परत घेण्याच्या मागणीसाठी पीडित युवतीचा छळ करण्यात येत होता. या छळाला कंटाळून अखेर युवतीने राहत्या घरावरून उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला व जबर मार लागल्याने ति मृत्यूशी झुंज देत होती.

भाजपचे नेते अनिल परिहार आणि त्यांच्या भावाची हत्या 

त्यानंतर तिची प्रकृती अधिकच बिघडल्याने तिला उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले होते. उपचाराला प्रतिसाद देत नसल्यामुळे तिला परत नांदेडातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी मंगळवारी रात्री तिचा मृत्यू झाला. अधिक तपास सुरू आहे.

जाहिरात