म्हणून पतीने पत्नीला ढकलले एलओसीवर, जवानांनी झाडल्या गोळ्या 

अमृतसर : वृत्तसंस्था – १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्लामुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. इतकेच नव्हे तर, या दहशतवादी हल्ल्यामुळे सीमेवरही तणाव निर्माण झाला आहे. याचदरम्यान एका पाकिस्तानी युवकाने पत्नीपासून सुटका करण्यासाठी तिला भारतीय सीमेवर ढकलले.त्यावेळी पाकिस्तानमधून भारतामध्ये कोणीतरी प्रवेश करत असल्याचे जाणवल्याने बीएसएफच्या जवानांनी गोळीबार केला.यामध्ये ही महिला जखमी झाली असून जवानांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.गुलशन (32)असे या महिलेचे नाव आहे.
पाकिस्तानी आर्मी कॅम्प मधील रहिवाशी गुलशन ही महिला सीमारेषा पार करून भारतात घुसली होती.यावेळी अंधारामध्ये जवानांना हालचाल जाणवली. म्हणून त्यांनी जागेवरच थांबण्याचे आदेश दिले. मात्र,ती न थांबताच आतमध्ये येत राहिली.यामुळे बीएसएफच्या जवानांनी गोळ्या झाडल्या.या गोळ्या लागल्याने ती जागेवरच कोसळली होती.रात्र असल्याने जवानांना काही दिसले नाही.त्यावेळी जसजसा दिवस उजेडात गेला दरम्यान जवानांनी तिचा शोध घेतला असता ती महिला असल्याचे समजले.
दरम्यान तिची चौकशी केली असता, तिचा पती तिच्यापासून सुटका करून घ्यायच्या प्रयत्नात होता.तीन दिवसांपूर्वी पाक लष्करासोबत पतीने हा कट रचला होता.अंधार असल्याने रेंजर्सनी सीमारेषेवर ढकलून दिले.असे तिने म्हंटले. इतकेच वनहे तर, भारतीय हद्दीत जाण्यासाठी रेंजर्सनीही दबाव आणल्याचे या महिलेने सांगितले.
विशेष म्हणेज, सर्व बाजुंनी चौकशी सुरु आहे. तिच्याजवळ एक तुटलेला मोबाईल सापडला आहे. उपचारानंतर या महिलेला डेरा बाबा नानक पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. बीएसएफची तुकडी 10 यांच्यांतर्गत येणाऱ्या भागामध्ये ही महिला घुसली होती. धुके असल्यामुळे जवान तिला पाहू शकले नाहीत. मानवी बॉम्ब असल्याच्या शक्यतेने जवानांनी गोळी झाडली. असे डीआयजी राजेश शर्मा यांनी म्हंटले आहे.