मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण : ATS ने दमन येथून जप्त केली महागडी व्होल्वो गाडी, कारचा हत्येसाठी वापर झाल्याचा संशय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता ATS च्या पथकाने मंगळवारी (दि. 23) पहाटे दमन इथून एक व्होल्वो कंपनीची महागडी गाडी जप्त केली आहे. या गाडीचा वापर मनसुख हिरेन यांच्या हत्येसाठी केल्याचा संशय एटीएसने व्यक्त केला आहे. म्हणूनच आता एटीएसकडून या गाडीची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. गाडीतून दोन बॅग्स आणि त्यात तीन जोडी कपडे मिळाले आहेत. दोन मोबाईल चार्जिंग, एक मास्क आढळला आहे. फॉरेन्सिकच्या 3 टीम गाडीचा तपास करत आहे.

एटीएसच्या पथकाने आज पहाटे दमन येथे छापा टाकून व्होल्वो ही महागडी कार (MH 05 DH 6789 ) जप्त केली आहे. वाझे यांच्या पार्टनटरची ही गाडी असल्याचे बोलले जात आहे. गाडीचा नेमका वापर काय आणि कशासाठी केला याचा तपास सुरु आहे. तपासात व्होल्वो गाडीचा सारखा उल्लेख आल्याने ATS ने केली कारवाई केली आहे. हिरेन प्रकरणात मुख्य आरोपी वाझेंना एनआयएने अटक केल्यानंतर ठाणे ATS ने दोन आरोपींना अटक केली आहे. सोमवारी देखील ठाणे ATS ने अनेक ठिकाणी झाडझडती घेतल्यानंतर आता ही मोठी कारवाई केली आहे.