धक्कादायक … ! आयटीआय प्रवेशासाठी पैसे नसल्याने विद्यार्थ्याने घेतला गळफास

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन

आयटीआय प्रवेशाकरिता पैसे नसल्यामुळे चक्क भिगवण येथील १८ वर्षाच्या तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवारी दि २४ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडली. या भागात ही या आठवड्यातील दुसरी घटना असल्यामुळे परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
[amazon_link asins=’B01BKEZYBY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4e03aa1c-a7a7-11e8-9464-431f137ec47c’]

याबाबत भिगवण पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंतामणी नाना सोनावणे (रा. मदनवाडी) यांनी याबाबत खबर दिली आहे. त्यांचा भाचा साईनाथ राजेंद्र पोपळघट (वय १८) असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दहावी पास झाल्यामुळे भिगवण येथील थोरात हायस्कूल येथे आयटीआयसाठी साईनाथने महिन्याभरापूर्वी प्रवेश घेतला होता.

गेल्या आठवड्यापासून साईनाथ हा आपले मामा आणि आई यांना शाळेची फी भरण्यासाठी पैशाची मागणी करत होता. मामाच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे तसेच आई पुणे येथे धुण्याभांड्याची कामे करून उदरनिर्वाह करत असल्यामुळे आपणाकडे फी देण्याइतके पैसे जमा झाली की लगेच फी भरू, असे सांगत आठवडा लोटल्यानंतर ही पैसे न मिळाल्याने अखेर साईनाथ याने असे टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती समोर येत आहे.
[amazon_link asins=’B07417987C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’52f36568-a7a7-11e8-86d7-218ef5dc771c’]

याच आठवड्यात गिरीष संजय गरगडे (वय २०) याने मदनवाडी-बारामती रस्त्यावरील ढवळे यांच्या विहिरीत उडी घेत आपले जीवन संपविल्याची घटना ताजी असतानाच आज घडलेल्या घटनेने परिसरातील नागरिकांनी धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे