अमेरिकेतील गोळीबारात ११ ठार, ६ जखमी

पीट्सबर्ग : वृत्तसंस्था – अमेरिकेत पीट्सबर्ग सिनगॉग येथे झालेल्या गोळीबारात मृतांचा आकडा आता ११ पोहचला असून या हल्ल्यात ६ जण जखमी झाले आहेत. हल्लेखोराने लाईफ सिनगॉग येथे ज्यु धर्मियांच्या शबात प्रार्थनेवेळी अंदाधुद गोळीबार केला. सगळ्या ज्यु लोकांनी मरायला पाहिजे असे हल्लेखोर ओरडत असल्याचे स्थानिक वृत्तसंस्थांनी म्हटले आहे. या प्रकरणी हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्थानिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पीट्सबर्गचे पोलीस कमांडर जेसन लांडो यांनी केले आहे.

हल्लेखोराला प्रत्युत्तर देत असताना काही अधिकारी जखमी झाल्याचे वृत्त सीएनएनने दिले आहे. गोळीबारात जखमी झालेल्या अधिकाऱ्यांबद्दल तात्काळ माहिती मिळू शकलेली नाही. एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती केडीकेने दिली आहे. स्क्वीरील हिल येथील इमारतीत हा हल्लेखोर असल्याची माहिती आहे. घराच्या बाहेर पडू नका असे पीटसबर्गचे पोलीस कमांडर जेसन लांडो यांनी स्थानिक रहिवाशांना आवाहन केले आहे.

घटनास्थळांना पोलिसांनी घेराव घातला होता. स्थानिक वृत्तवाहिन्यांवर सशस्त्र पोलीस परिस्थिती हाताळत असल्याचे दाखवण्यात येत होते. पोलिसांनी काही मार्ग बंद केले होते. रुग्णवाहिका सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पीटसबर्गमधील घडामोडींवर आपले लक्ष असल्याचे ट्विट राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.