नरभक्षक वाघिण अवनीच्या शुटरांचा गावकऱ्यानी केला सत्कार

यवतमाळ : पोलीसनामा आॅनलाइन – नरभक्षक वाघीण अवनीला मारल्यामुळे दिल्लीपासून मुंबई, नागपूर सह सर्वत्र राजकारण रंगले आहे. अनेक प्राणी प्रेमी संघटना अवनीच्या हत्येचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर आले आहेत. असे असताना राळेगाव -पांढरकवडा तालुक्यातील वाघग्रस्त अनेक गावातील नागरिकांनी एकत्र येऊन सावरखेड येथे मंगळवारी रात्री अवनी शुटर नवाब व त्यांच्या मुलाचा जाहीर सत्कार केला. इतके नाही तर त्यांना शाल, श्रीफळ आणि चांदीचा मुलामा असलेला वाघाचा पुतळा भेट म्हणून देण्यात आला.

यावेळी शुटर नवाब शहाफत अली खान यांनी सांगितले की, आम्ही शिकारी असलो तरी आम्हालाही वन्यजीवांचे प्रेम आहे. १३ शेतकरी, शेतमजुरांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघिण अवनीलाही जीवाने मारायचे नव्हतेच. तिला बेशुद्ध करण्यासाठी अनेक महिने वाट पाहिली, संधी शोधली. त्या रात्रीही बेशुद्धीचा प्रयत्न झाला. मात्र तिने थेट झडप घातल्याने आमच्या सोबतच्या इतरांचे संरक्षण करण्यासाठी नाईलाजाने तिच्यावर गोळी झाडावी लागली.

अवनीचे बछडे सापडले , पण…….   

सत्काराला उत्तर देताना शुटर शहाफत अली खान म्हणाले, मीदेखील प्राणीमित्रच आहे. मानवाप्रमाणे वन्यप्राण्यांचाही प्राण आहे. त्यांनाही जीवन जगण्याचा अधिकार आहे. मी आजपर्यंत अनेक ठिकाणी वाघांना बेशुद्धदेखील केले. अवनीलासुद्धा सुरुवातीला ट्रॅक्यूलाईझ डॉट मारला. आता १५ ते २० मिनिटांनी ती बेशुद्ध होईल असे वाटले. पण ती अधिक आक्रमक झाली. अवनी झुडूपात लपली. आम्ही पाळतीवर होतो. अशातच तीने आमच्या जिप्सीवर हल्ला केल्याने शेवटच्या क्षणी आमचे प्राण धोक्यात येणार होते. आम्ही रक्षणार्थ गोळी झाडली. मात्र गोळी झाडताना प्रचंड वेदना झाली. तथापि नाईलाज होता, असे त्यांनी स्पष्ट केले.

सोशल मीडिआ, राजकीय मंडळी, पक्ष व वन्यजीव प्राणी मित्र आदी नरभक्षक अवनी वाघीणीस का मारले, असा जाब सरकारला विचारत असताना वाघीणग्रस्त परिवारातील ग्रामस्थांनी वाघीणीला ठार करणाºया शॉर्प शुटर शहाफत अली खान व त्यांचा मुलगा अजगर अली खान व इतरांचा जाहीर सत्कार केला. सोबत एवढे दिवस वाघ शोध मोहीमेवर असलेले व वनकर्मचाऱ्यासोबत दिवाळी साजरी केली आहे.

याप्रसंगी शहाफत अली खान म्हणाले, आम्ही इतर ठिकाणीही अशी मोहीम राबविली आहे. मात्र येथील शेतकरी, शेतमजूर यांचे भयग्रस्त जगणे आम्ही जवळून बघितले. ते वाघीणीच्या भितीने घराबाहेर येत नव्हते. गावकºयांचे प्रचंड नुकसान व प्राणहानी बघता वाघीणीचा बंदोबस्त आवश्यक होता. प्रत्यक्षात अवनीवर गोळी झाडताना मी पण गंभीर होतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.