फायद्याची गोष्ट ! ‘या’ चार वेबसाईटवरून दिवाळीची खरेदी करा, हजारो रूपये वाचवा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – येत्या दिवाळीला तुम्हाला भरपूर खरेदी करायची इच्छा असेल मात्र तुमचे बजेट कमी असेल तर आम्ही तुम्हाला अगदी कमी दरात खरेदी करता येईल अशा वेबसाईटची माहिती देणार आहोत. ज्यावरून तुम्ही सर्वच गोष्टींची शॉपिंग अगदी स्वस्त दरात करू शकता. यासाठी अनेक ऑफर्स आणि कॅशबॅक सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत.

अ‍ॅमेझॉन
या वेब साईटवरून तुम्ही मोबाइल सहित अनेक घरगुती गोष्टी मोठ्या सूट सह विकत घेऊ शकता. विशेष म्हणजे या अ‍ॅपवरही तुम्हाला मोठा कॅशबॅक मिळेल. ऑर्डर घरी त्वरित बोलावण्यासाठीही यांच्याकडे अनेक प्लॅन उपलब्ध आहेत.

पेटीएम मॉल
ऑनलाइन व्यवहार सुरु केल्यानंतर पेटीएम या विश्वसनीय कंपनीने शॉपिंगसाठी सुद्धा आपली दार उघडी केली होती आणि आज अनेक जण पेटीएम मॉल वरून खरेदी करत आहेत. या दिवाळीत पेटीएमवर खरेदीसाठी खास ऑफर्स मिळणार आहेत या ठिकाणी अनेक ब्रँडेड गोष्टीवर देखील मोठी सूट मिळणार आहे

मिन्त्रा
सगळ्यात जास्त व्हरायटी असलेली शॉपिंग वेबसाईट म्हणून या वेबसाईटची ओळख आहे त्यामुळे यावरून तुम्ही विविध प्रकारची खरेदी करू शकता. यावरही तुम्हाला अनेक प्रॉडक्ट वर कॅशबॅक मिळणार आहे.

फ्लिपकार्ट
या वेबसाईटचे वैशिष्ट्य म्हणजे दिवसातील ठराविक वेळेसाठी ही वेबसाईट प्रचंड मोठा सेल सुरु करते ज्यामुळे अनेकदा यांचा सरोवर देखील डाऊन झालेला आहे. दरवर्षी इथेही दिवाळी सेल असतो. इथे बंपर सूट मिळते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तुम्ही इथून स्मार्टफोन, लॅपटॉप आणि अन्य सामान कमीत कमी किंमतीत घेऊ शकता. डिस्काउंटमुळे मोठ्या शॉपिंगवर तुमचे हजारो रुपये वाचू शकतात.