अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच ‘विवाहबद्ध’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची सगळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर हीने कमी काळात बॉलिवूडमध्ये आपले नाव कमावले आहे. बॉलिवूडमध्ये अनेक सुप्रसिद्ध कलाकारांच्या मुलांची एन्ट्री झाली आहे. त्यांनीही अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत तरी देखील आज ते आपल्या वडिलांच्याच नावाने ओळखले जातात. पण श्रद्धा कपूरचे तसे नाही. तिचे वडिल सुप्रसिद्ध अभिनेता शक्ति कपूरला तर सगळेच जाणतात. त्यांना कोणीही विसरू शकत नाही. त्यांची मुलगी श्रद्धा कपूर ही तिच्या नावानेच बॉलिवूडमध्ये ओळखली जाते. कारण तिने तसे स्थान निर्माण केले आहे. या अभिनेत्रीची एक गोष्ट समोर आली आहे. ही गोष्ट ऐकताच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसणार आहे. ती गोष्ट म्हणजे लवकरच श्रद्धा लग्न करतेय.

अभिनेत्री श्रद्धा कपूरने बॉलिवूडमध्ये अनेक सुरहिट चित्रपट दिले आहे. ती चाहत्यांची खूप आवडती अभिनेत्री आहे. ती लवकरच लग्न करतेय अशी बातमी समोर आली आहे. श्रद्धा अशी अभिनेत्री आहे जी आपल्या खाजगी जीवनाविषयी बोलताना नेहमी टाळाटाळ करत असते. अशी माहिती समोर आली आहे की, श्रद्धा कपूर २०२० मध्ये लग्न करणार आहे. ते कोणाशी अजून कळाले नाही कारण श्रद्धाचे नाव अभिनेता फरहान अख्तर, आदित्य कपूर यांच्यासोबत जोडले गेले होते.

View this post on Instagram

What if I dive deep, will you come in after me? 🎵🖤

A post shared by Shraddha (@shraddhakapoor) on

पण काही दिवसांपासून श्रद्धा ही बॉलिवूडचा प्रसिद्ध फोटोग्राफर रोहन श्रेष्ठाला डेट करत असल्याचे समजले आहे. हे दोघे एकमेकांना २०१८ पासून एकमेकांना डेट करत आहे. एका वृ्त्तसंसस्थेने दिलेल्या माहितीनूसार, दोघेही २०२० मध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर श्रद्धाच्या आईने लग्नाची सुरु केली आहे असेही समजले आहे.

View this post on Instagram

💖

A post shared by Shraddha (@shraddhakapoor) on

जेव्हा श्रद्धाला लग्नाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने ही सगळी अफवा असल्याचे सांगितले. त्याचबरोबर तिचे वडिल सुप्रसिद्ध शक्ती कपूर यांनी देखील सांगितले की ती ४ ते ५ वर्ष लग्न करणार नाही. सध्या तिच्याकडे चित्रपटांचे प्रोजेक्ट असल्याने ती खूप व्यस्त आहे. त्यामुळे ती सर्ल लक्ष आपल्या कामाकडे देत आहे.

सध्या अभिनेत्री श्रद्धा कपूर आपला आगामी चित्रपट ‘छिछोरे’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि श्रद्धा कपूर या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर श्रद्धा प्रभासच्या ‘साहो’ चित्रपटात देखील दिसणार आहे. रेमो डिसूजाच्या ‘स्ट्रीट डान्सर’ श्रद्धा काम करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता वरूण धवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या तिच्याकडे इतके प्रोजेक्ट असल्यामुळे ती लग्नाचा विचार करत नाही.

 

आरोग्यविषयक वृत्त

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like