Shraddha Kapoor | अभिनेत्री श्रद्धा कपूरचा रेड आऊटफिटमधील सिजलिंग फोटोशूट बघून नेटकरी अवाक

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) ही तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ करते. श्रद्धाचा कूल अंदाज चाहत्यांना नेहमी आकर्षित करतो. मात्र आता तिच्या हॉट अंदाजमधील फोटो पाहून चाहते अवाक झाले आहेत. अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) हिने इंस्टाग्रामवर रेड कलरच्या आऊटफिटमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या दिलखेचक अदांवर चाहते खूश झाले आहे. श्रद्धाचे हे नवीन फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा मोठा चाहता वर्ग आहे. ती सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसते. श्रद्धा फक्त तिच्या प्रोजेक्ट्सच्या अपडेट नेटकऱ्यांसोबत शेअर करत असते. तिचे इंस्टाग्रामवर 81.8 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. श्रद्धाने तिचे नवे हॉट फोटोशूट (Shraddha Kapoor Hot Photoshoot) केले आहे. यामध्ये तिने रेड कलरचा आऊटफिट परिधान केला आहे. तसेच तिने शॉर्ट हेअर स्टाईल केले असून ते ओले असल्याप्रमाणे स्टाईल केले आहेत. श्रद्धाचा आय मेकअप लक्षवेधी ठरत असून तिच्या अदांनी सर्वांना आकर्षित केले आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा वेगळा अंदाज आवडला असून नेटकऱ्यांनी तिच्या कमेंटचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरला अनेकांनी रेड हार्ट इमोजी कमेंट केल्या आहेत.

अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) हिने 2013 साली ‘आशिकी 2’ (Aashiqui 2) चित्रपटामधून बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. तिच्या अभिनयाच्या बळावर तिने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. श्रद्धाने ‘बाघी’ (Baaghi), ‘एक व्हिलन’ (Ek Villain), ‘ओके जानू’ (Ok Jaanu), ‘हाफ गर्लफ्रेंड’ (Half Girlfriend), ‘स्त्री’ (Stree), ‘छिछोरे’ (Chhichhore) या हिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. नुकतीच ती ‘तू झुठी मै मक्कार’ (Tu Jhoothi Main Makkaar) या चित्रपटामध्ये अभिनेता रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) झळकली होती. सध्या श्रद्धा तिच्या आगामी ‘स्त्री 2’ (Stree 2) या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS on Priyanka Chaturvedi | प्रियंका चतुर्वैदींवरील विधानावरुन मनसे संतापली, ‘शिर’साटांना थेट इशारा

Bhumi Pednekar | अभिनेत्री भूमी पेडणेकरची ‘डायमेन्शन्स मुंबई’ या नामवंत लघुपटाच्या स्पर्धेची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती

Sushmita Sen | सुष्मिता सेनने सांगितला हार्ट अटॅक नंतर आयुष्याबद्दल बदलेला दृष्टीकोन; “आयुष्य तुम्हाला दुसरी संधी देते तेव्हा…”

Mrunal Thakur | अभिनेत्री मृणाल ठाकूर हिने केले आहे का लग्न? ; फोटोंमुळे चर्चांना उधाण