श्रध्दा कपूरचा ‘साहो’ चित्रपटातील ‘ऍक्शन’बाज ‘लुक’ व्हायरल !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन  – प्रभास आणि श्रद्धा कपूर यांचा ‘साहो’ चित्रपट २०१८ पासून चर्चेत आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. चित्रपटाचे पहिले पोस्टर २१ मे ला प्रदर्शित झाले होते ज्यामध्ये प्रभास येलो गॉगल्स आणि ब्लॅक जॅकेट मध्ये दिसून आला होता. दरम्यान चित्रपटची लीड एक्ट्रेस श्रद्धा कपूरचा लुक देखील व्हायरल झाला आहे. या पोस्टर मध्ये श्रद्धा ऍक्शन करतांना दिसते आहे. श्रद्धा आणि प्रभासने सोशल मीडियावर आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेयर केले आहे. त्या पोस्टर मध्ये श्रद्धा आपल्या हातात गन पकडलेली दिसते आहे.

प्रभासने पोस्ट करत कॅप्शन मध्ये लिहिले की, डार्लिंग १३ जुनला टीजर सोबत साहोच्या दुनियेत आपले स्वागत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर खूप झपाट्याने व्हायरल झाला. हा चित्रपटपासून श्रद्धा तेलुगू इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट सुजीतने दिग्दर्शित केला आहे. सुजीतने आपले पदार्पण चित्रपट ‘रन राजा रन’ पासून आपल्या यशाची पायरी चढले आहेत. चित्रपटाचा प्रमोशनल व्हिडीओ चॅप्टर १ पासून चित्रपटा बद्दल कळाले होते. प्रभास आणि श्रद्धा यांच्या व्यतिरिक्त चित्रपटामध्ये नील नितिन मुकेश, मंदिरा बेदी, जॉकी श्रॉफ आणि चंकी पांडे सारखे कलाकार दिसून येतील. हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!

पुण्यातील डॉक्टर झटतेय काश्मीरमधील नागरिकांच्या आरोग्यासाठी

ई-फार्मसीसाठी ई-प्रिस्क्रिप्शनची गरज

रूग्ण वेळेत पोहचण्यासाठी रुग्णवाहिकेला आता ‘यल्लो कॉरिडोर’

Loading...
You might also like