Shreyas Iyer | कोलकाताच्या कर्णधारपदाची धुरा मुंबईकर खेळाडूवर; KKR ची मोठी घोषणा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Shreyas Iyer | आयपीएलचं (IPL) मेगा ऑक्शन चार दिवसांपुर्वी पार पडलं, यामध्ये अनेकजण लखपती झाले तर काहींना कोंटींची बोली लागली. अशातच कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने यंदाच्या सीझनसाठी संघाच्या कर्णधारपदाची (Captain) घोषणा केली आहे. कोलकाताने मुंबईकर खेळाडू (Shreyas Iyer) श्रेयस अय्यरच्या खांद्यावर नेतृत्त्वाची धुरा सोपवली आहे. याबाबत केकेआरन संघाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे.

 

कोलकाता संघाने मागील सीझनमधील संघाचा कर्णधार इयॉन मार्गनला त्याच्या खराब फलंदाजीमुळे संघातून वगळलं. संघव्यवस्थापन नवीन कर्णधारपदाच्या शोधात होतं. दुसरीकडे श्रेयस अय्यरने दिल्ली संघ सोडत ऑक्शनसाठी आपलं नाव दिलं. कारण दिल्ली कॅपिटल्सने (Dehli Capitals) ऋषभ पंतकडे (Rishabh Pant) कर्णधारपद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

 

ऑक्शनमध्ये (Auction) कोलकाताच्या संघाने श्रेअसला (Shreyas Iyer) आपल्या ताफ्यात घेण्यासाठी 12.25 कोटी रूपये मोजल. श्रेयस हा केकेआरचा इतिहासातील सहावा कर्णधार आहे. याआधी केकेआरसंघाचं नेतृत्त्व सौरव गांगुली, ब्रेंडन मॅक्युलम, गौतम गंभीर (Gautam Gambhir), दिनेश कार्तिक आणि इयॉन मार्गनने केलं होतं. ­केकेआरने आत्तापर्यंत दोनवेळा आयपीएलच्या विजेतेपदावर (Champion) आपलं नाव कोरलं आहे.

 

दरम्यान, श्रेयस अय्यर आपल्या नेतृत्वात केकेआरच्या (KKR) संघाला कितपत यश मिळवण्यात यशस्वी ठरतो हे आपल्याला यंदाच्या मोसमात दिसेल.
दुसरीकडे आयपीएलमध्ये आणखी दोन नवीन संघ दाखल झाले असून एकूण १० संघांमध्ये आयपीएलचा (IPL) थरार पाहायला मिळणार आहे.

 

Web Title :- Shreyas Iyer | Mumbaikars take over Kolkata captaincy; KKR’s big announcement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2748 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Mumbai Police | अमिताभ बच्चन यांना सुरक्षा पुरवणारे मुंबई पोलीस दलातील हवालदार निलंबित, ‘हे’ आहे कारण

 

Pune Amenity Space | भाजपने बहुमताच्या जोरावर वडगाव शेरीतील अ‍ॅमिनीटी स्पेस बिल्डरच्या घशात घातली ! राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार करणार