Shreyas Talpade Health Update | श्रेयस तळपदेची प्रकृती आता स्थिर, हृदयात ब्लॉक असल्याने केली अँजिओप्लास्टी, डॉक्टरांची माहिती

मुंबई : अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade Health Update) गुरुवारी रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्याच्या पत्नीने त्याला मुंबईतील अंधेरीतील बेलव्ह्यू रुग्णालयात (Bellevue Hospital) दाखल केले. ‘वेलकम टू जंगल’ (Welcome to Jungle) चित्रपटाच्या शूटिंगवरून घरी परतल्यावर त्याची प्रकृती बिघडली होती. आता श्रेयसची प्रकृती स्थिर (Shreyas Talpade Health Update) असून हृदयातील रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेज असल्याने त्याच्यावर अँजिआप्लास्टी (Angioplasty) करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे, असे वृत्त म.टा.ने दिले आहे.

हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याआधीच डॉक्टरांनी त्याच्यावर अँजिओप्लास्टी केली. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. त्याला आज किंवा उद्या डिस्चार्ज मिळू शकतो. (Shreyas Talpade Health Update)

श्रेयस तळपदे सध्या ‘वेलमक टू जंगल’ चित्रपटारच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून गुरुवारी त्याने काही अ‍ॅक्शन सीक्वेन्स
शूट केले होते. दिवसभर तो शूटिंगमध्ये व्यस्त होता. त्याची प्रकृतीही चांगली होती.
पण शूटिंग संपल्यानंतर तो घरी आल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने पत्नीने तातडीने रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात जाताना त्याला वाटेतच चक्कर आली होती. रात्री १० वाजताच्या सुमारास त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता त्याची प्रकृती स्थिर आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मोक्का गुन्ह्यातील फरार टोळी प्रमुख गजाआड, सहकारनगर पोलिसांची कारवाई

Pune Narayangaon ATS Action | एटीएसने नारायणगावातून ८ बांगला देशी नागरिकांना पकडले

आत्महत्या करण्याची धमकी देऊन 17 वर्षीय मुलीचा मानसिक छळ, तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा; कोंढवा परिसरातील घटना