Shri Mahavir Jaina Vidyalaya Trust | श्री महावीर जैन विद्यालय ट्रस्टच्या पंचवार्षीक निवडणुकीत सिद्धी पॅनेलने मारली बाजी, पुण्यातून राजेश शहा यांची सर्वाधिक मताने निवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shri Mahavir Jaina Vidyalaya Trust | श्री महावीर जैन विद्यालय ट्रस्टची सन 2023-2028 या पाच वर्षाकरिता देश पातळीवर निवडणूक (Election) नुकतीच पार पडली. पुणे येथून एकमेव उमेदवार राजेश शहा (Rajesh Shah यांची सर्वाधिक मताने निवड झाली. श्री महावीर जैन विद्यालय ट्रस्टच्या (Shri Mahavir Jaina Vidyalaya Trust) अटीतटीच्या निवडणुकीत सिद्धी पॅनलने (Siddhi Panel) बाजी मारली असून सर्व 5 उमेदवार बहुमताने निवडून आले आहेत.

अहमदाबाद येथून अनिताबेन मेहता (Anitaben Mehta, Ahmedabad), मुंबईमधून प्रकाशभाई शहा (Prakashbhai Shah), कमलेशभाई विकंसें (Kamleshbhai Vikansen, Mumbai), वीरेंद्र शहा (Virendra Shah) आणि पुणे येथून राजेश शहा (Pune) यांची निवड झाली.

श्री महावीर जैन विद्यालय ट्रस्ट (Shri Mahavir Jaina Vidyalaya Trust) हि 108 वर्ष जुनी संस्था असून तिची स्थापना सन 1915 साली झाली आहे. महावीर जैन विद्यालयचे (Mahavir Jaina Vidyalaya) देशभरात विदयार्थी व विद्यार्थिनीसाठी 12 वसतिगृह असून त्यामध्ये 2500 ते 3000 विद्यार्थी व विद्यार्थिनी राहतात. विद्यार्थ्यांना अतिशय माफक दरांमध्ये राहण्याची व भोजनाची अतिउच्च दर्जाची उत्तम व्यवस्था केली जाते. परदेशात शिक्षण (Study Abroad) घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य दिले जाते. विद्यार्थी व विद्यार्थिनीना अभ्यासासाठी प्रसन्न आणि पोषक असे वातावरण प्रत्येक वसतिगृहामध्ये आहे. अहमदाबाद येथील टोरंट ग्रुपचे (Torrent Group) संचालक सुधीरभाई मेहता (Director Sudhirbhai Mehta) हे महावीर जैन विद्यालय ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.

राजेश शहा यांची महावीर जैन विद्याल्याच्या ट्रस्टी पदी सलग दुसऱ्यांदा फेर निवड झाली आहे.
हि त्यांनी केलेल्या कामाची पावती आहे. राजेश शहा यांना नुकताच ‘व्यापारभूषण पुरस्कार’ महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस
(Maharashtra Governor Ramesh Bais) यांच्या हस्ते देण्यात आला आहे.
तसेच ‘जमनालाल बजाज उचित व्यापार पुरस्कार’ सलग तीन वेळा 1994, 1999, 2016 मिळाला आहे.
समाज भूषण, व्यापार भूषण, आदर्श व्यापारी अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना भूषवण्यात आले आहे.

राजेश शहा पूना गुजराती केळवणी मंडळाचे चेअरमन, एच .व्ही देसाई कॉलेज (HV Desai College) चे चेअरमन,
पी .जी .के .एम विद्याधामचे चेअरमन, एच .व्ही देसाई आय हॉस्पिटल (HV Desai Eye Hospital) चे अध्यक्ष,
पूना गुजराती बंधू समाजाचे मॅनेजींग ट्रस्टी, पूना हॉस्पिटलचे (Poona Hospital) ट्रस्टी आणि जनसेवा फौंडेशनचे
खजिनदार अशा अनेक सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि धार्मिक विविध संस्थेचे प्रमुख पदावर कार्यरत आहेत,
अशी माहिती महावीर जैन विद्यालयचे संचालक युवराज शहा (Director Yuvraj Shah) यांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rashmika Mandanna | अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने केले आहे गुपचूप लग्न; एका मुलाखतीमध्ये केले वक्तव्य