Shrikant Shinde On Aaditya Thackeray | जेलचं कोणाला सांगता, कंपनी स्थापन होण्याअगोदर तुम्ही टेंडर दिले

मुंबई : Shrikant Shinde On Aaditya Thackeray | इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आदित्य ठाकरे यांनी समोरासमोर येण्याचे आव्हान दिले होते. परंतु, दिल्लीला जाण्याचे कारण सांगून शिंदे यांनी कार्यक्रमाला येण्याचेच टाळले होते. याच कार्यक्रमात आदित्य यांनी शिंदे सकाळी लवकर उठत नाहीत, तसेच सरकार भ्रष्टाचारी असल्याचे म्हटले होते. आदित्य यांच्या या आव्हानाला आता मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी प्रतिआव्हान दिले आहे. (Shrikant Shinde On Aaditya Thackeray)

खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंचे आव्हान स्वीकरताना पत्रकार परिषदेत म्हटले की, जेलचं कोणाला सांगता, कंपनी स्थापन होण्याअगोदर तुम्ही टेंडर दिले आहेत. हे सगळे काळे कागद कोणाचे आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळात कोणाला जेलमध्ये जावे लागेल हे दिसेल. (Shrikant Shinde On Aaditya Thackeray)

श्रीकांत शिंदे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी पक्षासाठी काठ्या खाल्ल्या आहेत, गुन्हे दाखल करुन घेतले आहेत. तुम्ही काय केले?
तुम्ही सभा घेण्यासाठी कुठे जायचा तेव्हा तुमचा फूड ट्रंक तुमच्यासोबत असायचा. जर काही मिळाले नाही,
तर आम्ही आणायला जायचो. त्यांना सँडविच लागायचा, स्पिंगला लागायचा. तेव्हा आम्ही नांदेडला असलो तर एकजण संभाजीनगरला जायचा, एकाला हैदराबादला पाठवायचे. त्यांना कोल्ड कॉफी आवडायची, म्हणून आम्ही त्यांच्या गाडीमध्ये कोल्ड कॉफी ठेवायचो, सँडविच ठेवायचो.

श्रीकांत शिंदे यांनी पुढे म्हटले, तुम्हाला डिबेट करायचंय ना, चला आपण दोघे चर्चा करू. आमचा सोर्स ऑफ इन्कम काय,
तुमचा सोर्स ऑफ इन्कम काय आहे, हे लोकांसमोर ठेवा. शिवसैनिकांना कळू द्या. कोविड काळात केलेला भ्रष्टाचार,
बीएमसीमध्ये केलेला भ्रष्टाचार आता समोर येतोय. जेलमध्ये जाण्याच्या भीतीनेच हे मोदींचे पाय धरायला गेले होते.

इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत हे
सरकार
शंभर टक्के भ्रष्टाचारी असल्याचे म्हटले होते. ही टीका सत्ताधारी पक्षाला झोंबली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray On Maharashtra Govt | ‘पेशंट टेबलावर आणि डॉक्टर दौर्‍यावर असा उथळ कारभार सध्या सुरु’; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर घणाघात (व्हिडिओ)