Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन

सलग 3 दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने अयोध्येतील राम लल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेच्या (Ram Pran Pratishtha) निमित्ताने तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 21 ते 23 जानेवारी या कलावधीत या कार्यक्रमांचा पुणेकरांना लाभ घेता येणार आहे. (Pune News)

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त व उत्सव प्रमुख पुनीत बालन (Punit Balan) यांनी या कार्यक्रमांची माहिती दिली. आयोध्येत श्री. प्रभू रामचंद्राचे भव्य मंदिर उभे रहात आहे. या मंदिरात रामलल्ला मुर्तीची प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या सोमवारी होणार आहे. त्यानिमित्ताने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरातही श्री प्रभू रामाची व गणपतीची आरती, महाआरती, भजन, रामरक्षा पठण, दीपोत्सव अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुणेकरांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन ट्रस्ट तर्फे श्री. पुनीत बालन यांनी केले आहे.

असे असणार कार्यक्रम…

(दि.२१ जानेवारी २०२४ रोजी)

  • स. ८:३० – महाआरती
  • स. ११:०० श्रीराम पथकाकडून आरती
  • दु. १२:०० – भजन

दु. 3:00 – बीवीआए, पुणे रामरक्षा पठण

  • सायं. ५:३० – रामरक्षा पठण आणि राम नाम जप
  • रात्री ८ वा – महाआरती

(दि. २२ जानेवारी २०२४)

  • प्रातः ६:३० – ८:०० रामरक्षा पठण (११ वेळा व राम जप (१००८))
  • स. ८:३० वा – महाआरती

स. ९:३० – ११:०० शहरातील राम मंदिरात मानाचे ताट अर्पण
स. ११:०० – १:०० – रामलल्ला मुर्तीच्या विधीवत प्रतिष्ठापनेचे थेट प्रक्षेपण (ध्वनिचित्रफित)

  • दु. १२:३० – १:३० ढोल ताशांच्या गजरात प्रतिष्ठापना सोहळा
  • दु. १:३० – ४०० – श्री विष्णु याग – दु. ६:३० – ७:४५ दिपोत्सव
  • रात्री ८ वा – महाआरती

(दि. २३ जानेवारी २०२४)

  • सायं ४:००-६:०० – मंदिरात समर्थ रामदास पादुका दर्शन
  • सायं ६.३० ते ८.०० पुणे विद्यार्थी गृहाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडून श्री राम रक्षा आणि हनुमान चालीसा पठण

आयोध्येत होत असलेला रामलल्ला प्रतिष्ठापनेचा सोहळा ऐतिहासिक असणार आहे. करोडो देशवासियांचे स्वप्प्न साकार होत आहे. यानिमित्ताने श्रीमंत भाउसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून पुढील तीन दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पुनीत बालन (उत्सव प्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police News | ‘सॉरी बाबा… माफ करा…’ मद्यधुंद पोलिस उपायुक्ताने (DCP) 3 जणांना उडवलं; ताबा सुटल्याने SUV खड्ड्यात

Sharad Mohol Murder Case | गुंड विठ्ठल शेलारची ‘बुलेटप्रुफ स्कॉर्पिओ’ गुन्हे शाखेकडून जप्त, शरद मोहोळ खून प्रकरणात सहा महागड्या गाड्या जप्त