Shrimant Bhausaheb Rangari-Guruji Talim Mandal-Pune Dahi Handi 2023 | यंदाही रंगणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि गुरुजी तालीम मंडळाच्या दहीहंडीचा थरार ! संगीतकार, गायक अजय-अतुल, क्रिकेटर केदार जाधव यांच्यासह अनेक दिग्गज व सुप्रसिध्द कलाकार, अभिनेते लावणार हजेरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shrimant Bhausaheb Rangari-Guruji Talim Mandal-Pune Dahi Handi 2023 | श्रीमंत भाउसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust) आणि गुरुजी तालीम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीही भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावर्षीच्या दहीहंडी महोत्सवाला प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल (Composer Ajay-Atul), अभिनेते प्रविण तरडे (Pravin Tarde), ईशान्य महेश्वरी, भारतीय क्रिकेटर केदार जाधव (Kedar Jadhav), डीजे तपेश्वरी, डिजे अखिल तालरेजा ही कलाकार मंडळी उपस्थित राहणार आहेत. (Shrimant Bhausaheb Rangari-Guruji Talim Mandal-Pune Dahi Handi 2023)

कोरोना महामारीचे संकट दूर होऊन सरकारने निर्बंधमुक्त उत्सव साजरे करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब गणपती ट्रस्ट आणि मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ यांनी एकत्र येत गतवर्षीपासून भव्य असा सार्वजनिक दहीहंडी महोत्सव सुरु केला आहे.

लक्ष्मी रस्त्यावर गुरुजी तालीम गणपती चौकात ही दहीहंडी कार्यक्रम होतो.
गतवर्षी झालेल्या पहिल्याच वर्षी तब्बल ५० हजार तरुणांच्या उपस्थितीत ही दहीहंडी फोडली गेली होती.

यावर्षी या मोहत्सवाचे दुसरे वर्ष आहे. गुरुवारी साय. ४ वाजता या कार्यक्रमाला सुरवात होणार आहे.
जास्तीत जास्त युवा वर्गाने या दहिहंडी उत्सवासाठी उपस्थितीत राहावे असे
आवाहन श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन (Punit Balan) यांनी केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation Protest | मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसी संघटनांचा विरोध; राज्य सरकारला दिला इशारा

MHADA Pune Lottery | म्हाडातर्फे 5 हजार 863 सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरूवात

Pune Dahi Handi – Traffic Updates | पुण्यात दहिहंडी उत्सावानिमित्त वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

पुणे: चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा दाबून केला खून